चंद्रपूरप्रशासनराज्यविदर्भ

अवैध धंद्यावर बसला आळा…

निवडणुकीच्या काळात चोख पोलिस बंदोबस्त

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(शंकरपूर-चंद्रपूर) – निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात ठिक – ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त व अतिरिक्त पोलीस चौक्या लागलेल्या आहेत.

यामुळे अवैध दारू, अवैध पैसा याला आळा बसला असून त्याकरता राजस्व विभाग व पोलीस विभागाची संयुक्त टिम तयार करून शंकरपुर येथील विद्युत मंडळाच्या कार्यालया जवळ चोख बंदोबस्तात येणाऱ्या-वाहनांची तपासणी करून वाहनांना सोडण्यात येत असून अवैद्य येणाऱ्या मालाला आळा बसत आहे.

तसेच शंकरपूर पोलिस चौकीचे कार्यभार सांभाळणारे एपीआय जांबळे यांच्या नेतृत्वात रामटेके, लोटकर, उरकुडे, नागरगोजे परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करत परिसरामध्ये शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: