इतरगुन्हेविश्वपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

कुणाल वाईन शाॅपमध्ये दरोडा; 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

कोँढवा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील घटना

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – कोँढव्यातील समतानगर भागातील राजमहल सोसयटी जवळ असलेल्या कुणाल वाईन्सवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात दुकानाच्या गल्यातील 1 लाख 75 हजार रुपये रोख रक्कम त्यांनी लंपास केली. ही घटना कोंढवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार महेश असवाणी हे नेहमीप्रमाणे 27 सप्टेंबरच्या रात्री दुकानाला कुलूप लावून घरी गेले. मध्यरात्री चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गल्यातील रोख रक्कम रु. 1 लाख 75 हजार घेऊन घटनास्थळावरुन पोबारा केला. जेव्हा असवाणी हे 28 सप्टेंबरच्या सकाळी आपले दुकान उघडण्यासाठी आले त्यावेळी त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

या संदर्भात दुकानाचे मालक महेश असवाणी (53, रा. कोँढवा, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप-निरिक्षक निंबाळकर हे करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: