उत्तर महाराष्ट्रनाशिकरणधुमाळीराज्य

भारिप, वंचित बहुजन आघाडी बागलाण तालुकाध्यक्षपदी चेतन वनिस यांची नियुक्ती

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (सटाणा-नाशिक) भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीच्या बागलाण तालुकाध्यक्षपदी पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ व धडाडीचे कार्यकर्ते चेतन वनिस यांची एकमताने नियुक्ती झाली.

सटाणा येथील आयोजीत करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बच्छाव, जिल्हा महासचिव निलेश केदारे, सचिव युवराज दाणी, जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बच्छाव, माजी तालुकाध्यक्ष संदिप वाघ, शहर अध्यक्ष शेखर बच्छाव, युवा तालुकाध्यक्ष किरण बच्छाव, युवा शहराध्यक्ष जितेंद्र सरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत वनिस यांच्या नावाला एकमताने पसंती देण्यात आली.

चेतन वनिस यांच्या तालुकाध्यक्ष पदाच्या प्रस्तावाची मांडणी तालुकामहासचिव सुनिल जगताप यांनी केल्यावर शहर महासचिव दादा खरे यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनी सर्वांचे मत विचारात घेत वनिस यांची भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष म्हणुन घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित समुहांच्या मतांचे धृविकरण करत मोठ्या प्रमाणात मतांची गोळाबेरीज करण्यात वंचितला यश आल्याने वंचितकडे प्रस्तापित पक्षांचे कार्यकर्तेही आकर्षीत होत असल्याचे चित्र काही ठिकाणी बघायला मिळत आहे. याचीच एक कडी बागलाणमध्ये दिसायला सुरुवात झाली.

विधानसभेच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीच्या सर्वच खाचाखुचा माहित असलेले सक्रीय कार्यक्रर्ते चेतन वनिस यांची बागलाण तालुक्याच्या अध्यक्षपदावर वर्णी लागने हे वंचितच्या पुढील राजकीय वाटचालीचा सुतोवाच स्पष्ट करणारे ठरणार आहे.

तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारताच आपली भूमिका मांडताना वनिस म्हणाले की, ‘येणाऱ्या विधानसभेसाठी वंचितकडून सक्षम उमेदवार देण्याची आमची रणनीती असून प्रस्तापितांच्या दावणीला बांधलेला बागलाणच्या राजकारणाला वंचितच्या रुपाने एक मोकळा श्वास घेण्याची संधी मतदारांसमोर उभी करणार आहोत.

बागलाणच्या मुळ पायाभूत प्रश्नांवर आम्ही काम करणार असून येथील शेतकरी, कष्टकरी, कामगार, छोटे उद्योग मालक, या सर्वच समुहांच्या प्रश्नांसाठी वंचित नेहमी सोबत राहिल असा विश्वास या घटकांमध्ये आम्ही पेरणार आहोत.
जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी सर्वांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे यास मी तंतोतंत पात्र ठरणार’, असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी युवा तालुका महासचिव महेंद्र सोनवणे, दिपक पाटील, कडू वनिस, बाळा आहिरे, सुनिल आहिरे, भुषण म्हसदे, सुमित उशिरे, प्रकाश खरे, साजन बानिस्कर, अतुल शेजवळ, सुनिल वनिस, मिलींद खरे, विनोद आहिरे, दिलीप गांगुर्डे, किरण आंबेकर, चिकु गायकवाड, चारुदत्त पवार यांसह जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: