क्रीडाचंद्रपूरराज्यविदर्भ

उत्कृष्ठ खेळाळूनी राज्याचे नाव देशपातळीवर चमकवावे – प्रकाश संकपाल

राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबाल क्रिडा स्पर्धा

Spread the love

निखील खानोरकर, (चीमूर-चंद्रपूर) – शालेय विद्यार्थांसाठी क्रिडा स्पर्धा महत्वाचा घटक आहे. कुठल्याही पद्धतीने वर्कआउट केल तर विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचु शकतो. शासनाने क्रिडा स्पर्धाच्या माध्यमातुन खेळाळूसाठी काही जागा, पद आरक्षीत केले आहे. खेळात विद्यार्थ्यासाठी मोठी संधी आहे. याचा फायदा विद्यार्थ्यानी घेतला पाहीजे. खेळात जिंकनेच महत्वाचे नसते त्यात सहभाग सुद्धा महत्वाचा असतो. स्पर्धात खेळाळूनी हार मानु नये चुकाचे अवलोकन करून नविन शिकन्याचा प्रयत्न करावा. ग्रामीन भागातील खेळाळूत जिद्द चिकाटी असते ति कायम ठेवावी. स्पर्धात जय, पराजय होत असते यातुनच उत्कृष्ठ खेळाळू तयार होतात. उत्कृष्ठ खेळाळू म्हणुन नाव लौकीक करनाऱ्या खेळाळूनी राज्याचे नाव देशपातळीवर चमकवावे. चिमुर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबाल क्रिडा स्पर्धा दरम्यान अनुसूचीत जाती मुलींचे वस्तीगृह येथे शनीवार ला बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल शालेय क्रिडा स्पर्धात सहभागी झालेल्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना बोलत होते.

शुक्रवार पासुन सूरू झालेल्या तिन दिवसीय राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबाल अंडर नाईंटीन मुले, मुलींच्या क्रीडा स्पर्धा, क्रिडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा खेल परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, बालाजी क्रिडा संस्था चिमूर यांच्या संयुक्त विद्यमानाने चिमूर येथील पोलीस ग्राऊंड व सेंट क्लैरेंट स्कुल चिमूर येथे क्रिडा स्पर्धा घेन्यात आल्या. विजेत्या टिमच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अनुसुचीत जाती मुलींचे वस्तीगृह चिमूर येथे पार पडला.

यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमुरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल प्रमुख पाहुणे तहसीलदार संजय नागटिळक, अनंतजी बोबडे साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, सेंट क्लैरंट स्कूल चे प्राचार्य फादर घोष, बालाजी स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष मिलींद कडवे, माजी क्रीडा संयोजक प्रकाश पोहनकर ,चिमूर तालुका क्रीडा समितीचे सचिव भास्कर बावणकर, मुलींच्या निवासी शाळेच्या वार्डन सुनिता खोब्रागडे प्रेस असोचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान व्हॉलीबालस्पर्धचे पंच, सामना अधिकारी, स्पर्धाला मदत करनारे क्रिडा शिक्षक, शारीरीक शिक्षक व निवड समिती सदस्य, विवीध विभागातील माजी व्हॉलीबाल खेळाळू यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करन्यात आला.

या स्पर्धासाठी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, अमरावती, व नागपूर विभागातील व राज्यातील आठ विभाग अंडरनाईंटीन शालेय २८८ मुले व मुली यांनी सहभाग घेतला. शुक्रवारपासुन सुरू झालेल्या व्हॉलीबाल शालेय स्पर्धा नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाच्या नियोजीत ग्राऊंड वर घेन्यात येनार होत्या मात्र शुक्रवारला झालेल्या पाऊसाने ग्राउंडवर गाढन पडल्यामुळे प्रशासनाच्या पोलीस ग्राउंड व सेंट क्लैरेंट स्कुलच्या ग्राऊंडवर व्हॉलीबाल स्पर्धा शालेय मुले, मुलींच्या, उध्दघाटन मैच घेन्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन सुनिल पोहनकर, प्रात्सावीक अनंत बोबडे आभार सतिश मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील विद्यार्थी,शिक्षक उपस्थीत होते.

या सघांनी पटकवीले विजयी चषक –
यामध्ये मुलांच्या स्पर्धातुन प्रथम क्रमांक नागपुर विभागातुन स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे ज्युनि. महा. चोरा ( भद्रावती, चंद्रपूर ), द्वितीय क्रमांक पुणे विभागातील प्रेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर, तृतीय क्रमांक औरंगाबाद विभागातील श्री स्वामी विवेकानंद आर्ट कॉमर्स सायन्स विद्यालय. गंगापूर,चतूर्थ क्रमांक नाशिक विभाग आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज चोपडा ( जळगाव ) यांनी विजयी चषक पटकवीला आहे. व मुलींच्या स्पर्धात प्रथम क्रमांक पुणे विभागातील विद्या प्रतिष्ठाण आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज बारामती, द्वितीय क्रमांक कोल्हापूर विभाग विठा माता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कराड, तृतीय क्रमांक नाशिक विभाग डॉ दे बिटको बॉइज हायस्कुल व ज्युनी. कॉलेज नाशिक, चतुर्थ क्रमांक अमरावती विभाग शिवाजी कनिष्ठ महा. यवतमाळ यांनी विजयी चषक पटकविला आहे.

बारा खेळाळूची होनार राष्ट्रीय व्हॉलीबाल संघासाठी निवड-
राज्यस्तरीय शालेय मुले, मुलींच्या व्हॉलीबाल क्रिडा स्पर्धातील विजेत्या संघातील उतकृष्ठ काही खेळाळू व ज्या विभागातील खेळाळूनी स्पर्धा दरम्यान उतकृष्ठ चांगली कामगिरी केली अशा खेळाळूची सूध्दा निवड राष्ट्रीय संघाकरीता रवीवारला राष्ट्रीय व्हॉलीबाल निवड चाचणी सदस्यासमोर होनार आहे. यातुन बारा मेरीट खेळाळूची निवड राष्ट्रीय व्हॉलीबाल संघासाठी करन्यात येनार आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: