उत्तर महाराष्ट्रजळगावराज्य

आधुनिक तंत्रज्ञातुन सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता -डॉ. एस.एम.पाटील

Spread the love
महाराष्ट्र विश्व न्यूज ,(रावेर जळगाव)-डॉ. उ.पा.कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूत व कृषिकण्या यांच्यामार्फत निंभोरा येथील सोसायटीच्या दालनामध्ये कृषी मेळावा उत्साहात पार पडला.या मेळाव्यात खिर्डी बु.,खिर्डी खु.,रेम्भोटे,म्हसकवाद सिम,बलवाडी,अमोदा, सातोद इ.गावातील शेतकऱयांनीसह युवा वर्ग उपस्तिथ होता. या मेळाव्यात आधुनिक शेती कशी करावी, या बाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
शाश्वत एकात्मिक शेती, कृषी यांत्रिकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, बदलत्या हवामानावर आधारित अधिक जनजागृती, सेंद्रिय शेती, थेट विक्री, संरक्षित शेती यावर अधिक भर दिला पाहिजे. यासह शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, तसेच मका,केळी आणि कपाशी वरील समस्या बद्दल माहितीदेण्यात आली, असा भरगच्च कार्यक्रम पार पडला.या वेळी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती,साहाय्यक कृषी अधिकारी श्री.गायकवाड यांनी दिली.तर आधुनिक तंत्रज्ञांनाच्या मदतीने सेंद्रिय शेतीचा विकास साधता येऊ शकतो,असे जळगाव कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पाटील सर संवाद साधताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिगंबर चौधरी सह व्यासपीठावयर फ्रूट सेल सोसायटी चे चेरमन प्रल्हाद बॉंडे यांच्यासह इतर सरपंच,उपसरपंच उपस्थित होते.कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी कृषीदूत शुभम पाटील,कुणाल पवार,रोहित पिंपळे,शुभम राजपूत,  यांच्यासह इतर कृषिदूतानी आणि कृषी कन्या यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: