उत्तर महाराष्ट्रनाशिकराज्य

बागलाण विधानसभेच्या विजयासाठी वंचितचा संकल्प मेळावा

Spread the love
महाराष्ट्र विश्व न्यूज ,(बागलाण नाशिक )-लोकसभा निकडणुकीनंतर राजकीय पटलावर चर्चेच्या मध्यवर्ती बिंदू म्हणून चमकणाऱ्या भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीने बागलाण तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीत यशस्वी कामगिरीसाठी संकल्प मेळावा आयोजीत करुन बागलाणच्या राजकारणात नवा सक्षम पर्याय म्हणून नावारुपास येण्याचा ध्यास व्यक्त केला.
गेल्या काही दशकांपासून बागलाणचे राजकारण हे केवळ भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन धृवांभोवतीच फिरत असताना आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितच्या प्रवेशाने प्रचाराचे रिंगण चांगलेच गाजण्याची चर्चा बागलाणमध्ये होत आहे.
या चर्चेला दुजोरा ठरावा यासाठीच भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सटाणा येथे संकल्प मेळावा पार पडला.
या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारिप बहुजन महासंघांचे नाशिक जिल्हा अध्यक्ष भारत म्हसदे हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षिय मार्गदर्शनात म्हसदे म्हणाले की, ‘येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलाण विधानसभेच्या उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी करण्यासाठी चार ते पाच इच्छूक उमेदवारांनी संपर्क केला असून त्यांचा अहवाल आणि त्यांच्याविषयीची गोपनिय माहिती या सर्वांचा विचार करुन  योग्य, सक्षम आणि खऱ्या अर्थाने वंचित समुहाला न्याय आणि राजकीय सन्मान देऊ शकेल अशा उमेदवाराचा निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वत: घेतील, या उमेदवाराच्या पाठीशी आपण सर्व प्रामाणिकपणे उभे राहू’, त्याला भरघोस मतांनी विजयी करु असा संकल्प या मेळाव्याच्या माध्यमातून करीत आहोत असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बच्छाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग हा बागलाण मध्ये पुर्णपणे यशस्वी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. बागलाण तालुका हा आदिवासी, दलित, धनगर, माळी, सत्तेपासून दूर राहीलेला मराठा वंचित समुह, छोट्या ओबीसी जातींनी युक्त असून अशा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची यशस्वी पताका झळकण्यास पोषक वातावरण असल्याचा आशावादही त्यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये पेरला.
विधानसभेच्या तोंडावर हा मेळावा झाला असतानाच मराठा समाजातील दिपक पाटील तसेच अन्य समुहांनीही सामुहीकरित्या वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश करुन पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहण्याचा विश्वास व्यक्त केला. अशा बेरजेच्या राजकारणाचा वंचितला फायदा होणे येणाऱ्या विधानसभेत अपेक्षित आहे.
या मेळाव्याप्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष निलेश केदारे, जिल्हा सचिव युवराज दाणी,  जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बच्छाव, तालुकाध्यक्ष संदिप वाघ,  तालुका महासचिव सुनिल जगताप, सटाणा शहर अध्यक्ष शेखर बच्छाव, शहर महासचिव दादा खरे, युवा तालुकाध्यक्ष किरण बच्छाव, युवा शहराध्यक्ष जितेंद्र सरदार, चेतन वनिस, साजन बाविस्कर, अतुल शेजवळ, चारुदत्त पवार, चिकु गायकवाड यांसह जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: