आरोग्यठाणेनवी मुंबईपर्यावरणपालघरप्रशासनमदतीचा हातमुंबईमुंबईयोजनारणधुमाळीराज्यसामाजिक संस्था

वंचित बहुजन आघाडी आरे वाचवण्यासाठी कटिबद्ध

Spread the love

 

मुंबई – सध्याच्या युतीच्या सरकारला विकासाच्या नावाखाली आरेचा भूखंड गिळंकृत करायचा आहे. आरे वासीयांना व तेथील आदिवासिना त्यांच्या जमिनी आणि जंगलाचे संवर्धन करायचे आहे. मंबईला परापासून वाचवण्यासाठी हे जंगल अत्यंत आवश्यक आहे. सध्या मुंबईत ठिकठिकाणी होत असलेली मेट्रोची कामेमुंबईकरांच्या कुठल्याच दैनंदिन जगण्याचा विचार न करता अविरत सुरू आहे. त्यातून होत असलेल ध्वनि प्रदूषण, वायु प्रदूषण, ठिकठिकाणी चाललेली ड्रिलिंगची कामे, रस्त्यावरील खड़े व वाहतूक कोंडी या सर्वांमुळे मुंबईकर जेरीस आलेला आहे, त्यांच्यावर एक प्रकारचा मानसिक आणि शारीरिक ताण आला आहे. तरीही मुंबईकरांचा मेट्रोला मुक पाठिंबा आहे. मेट्रो आली म्हणजे खरच विकास होणार आहे का? लोकांना याची जाणिव आहे की मेट्रो साठी विविध पर्याय देखील उपलबद्ध आहेत, असू शकतात. असे वंचित बहुजन आघडीने पत्रकार परिषदेत घेत  सांगितले.

.
परंतु काही अधिकाऱ्यांना ‘आरे’ शिवाय मेट्रो उभी करणे अशक्य वाटत असेल तर त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकतात. आतापर्यंत आलेल्या प्रत्येक सरकारने मुंबईच्या विकासाच्या नावाखाली मुंबईवर अतिक्रमणे केली असून मुंबईला कॉन्क्रिटचे जंगल केले आहे. सध्याच्या सरकारने मात्र यावर कळस चढवला आहे. मेट्रोच्या याकारशेड मुळे आरेमधल्या अनेक आदिवासींच्या जमिनी जाणार आहेत. अनेक झाडे कापली जाणार आहेत.

परिणामी तिथे मोकळे मैदान तयार करून अनेक बिल्डरांना आंदण दिले जाणार आहेत. त्याचा फायदा आताच्या सरकारमधील काही नेत्यांना होणार आहे ; हे उघड आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही असे मानतो की जनतेसोबत आहोत त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी आरे मधील मेट्रो कारशेडच्या या प्रकल्पाला आणि जनहितार्थ कारणासाठी ह्या सरकारचाही निषेध करते.
आम्ही मुंबईचे दिल्ली होवू देणार नाही. विधानभवनात आमचे कितीही आमदार निवडून आले ते सर्व आमदार विधानभवनाच्या वाहेर या प्रकरणी आंदोलन करून हा कारशेडचा प्लान रद्द करण्यासाठी आग्रही रहातील. आरेतील सर्व आदिवासींच्या जमिनी सुरक्षित राहतील यासाठी वंचित बहजन आघाडी प्रयत्न करेल.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: