परभणीमराठवाडाराज्य

पाथरीत पोलीस वसाहतीत घाणीचे साम्राज्य, सुविधांकडे दुर्लक्ष

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(पाथरी)-पाथरी शहराच्या संरक्षणासारख्या जबाबदारीचे महत्त्वपूर्ण काम करणार्‍या पोलिस प्रशासनाच्या कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण परिसराला काटेरी झाडेझुडपे यांनी वेढले आहे. तर निवासस्थानांच्या छतावर असणारी सिमेंटचे पत्रे पावसाळ्यात गळत असल्याने येथे राहणार्‍या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाची तारांबळ होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 शेजारी पाथरी शहरात असणार्‍या पाथरी पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव आहे. बहुतांश निवासस्थानाच्या बाजूला जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत .स्वतः पोलीस निरीक्षकांच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी असणारा रस्ता गवत झुडपांनी वेढला आहे .त्यामुळे त्यांना पर्यायाने कच्च्या रस्त्याने निवासस्थानाकडे जावं लागतं. जवळपास सर्वच निवासस्थाने जीर्ण झाले असल्याने पावसाळ्यामध्ये सिमेंटचे पत्र्यांमधुन पाणी गळती होत घरांमध्ये पाणी उतरल्याने संसार उपयोगी साहीत्य भिजल्याच्या प्रकार पावसाळ्यात नित्याचा आहे .

निवास्थान परिसरामध्ये घरातून निघण्याच्या सांडपाण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे हे पाणी सरळ रस्त्यावर येतं ,त्यामुळे या ठिकाणी घाण पसरते. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे .पिण्याच्या पाण्यासाठी नगरपालिकेच्या नळ योजनेचे पाणी आहे .पूर्वी बोअरद्वारे पाणी आणुन कायम पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या जलकुंभ मोडकळीस आला असुन गवत झाडाझुडपांनी वेढला आहे . मागील अनेक वर्षापासुन सदरील जलकुंभ बंदच आहे . त्याचबरोबर परिसरातील असणारे हातपंप नादुरुस्त असल्याने गैरसोय मध्ये भर पडली आहे. सोय सुविधा वाढवत निवास्थानांची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी कर्मचारी यांच्या कुटुंबाकडून यावेळी होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: