पश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

‘महाजनादेश ही जनतेवर लादलेली यात्रा’: राजू शेट्टी

Spread the love

महाविश्व न्यूज ,(पुणे)- ’देशात बेरोजगारी वाढत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, राज्य दुष्काळात होरपळत आणि पुरात गटांगळ्या खात आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत यांपैकी कोणतेही प्रश्न दिसत नाहीत. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही जनतेवर लादलेली यात्रा आहे,’ असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. ’कडकनाथ कोंबडी पालन गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा अंमलबजावणी संचालनालयाच्या (इडी) कार्यालयावर मोर्चा काढू’, असा इशाराही त्यांनी दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष, संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ’प्रजा लोकशाही परिषद’ या नव्या आघाडीची घोषणा राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. या वेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. ’पिकविम्याचे पैसे, बहुचर्चित जलयुक्त शिवार, विहिरींचे काय झाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासह विविध स्मारकांच्या उभारणीला किती गती मिळाली, दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीतून किती शेतकरी कर्जमुक्त झाले, याची यादी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत जाहीर करावी,’ असे आव्हानही त्यांनी दिले.

’भाजप, शिवसेना सत्ता, पैशाचा अनिर्बंध वापर करून वंचितांना त्रास देत आहे, तर विरोधक भयगंडाने पछाडलेले आहेत. अशा परिस्थितीत जातीयवादी शक्तींना विरोध आणि वंचितांच्या घटनात्मक अधिकारांच्या रक्षणाची भूमिका घेत ही अराजकीय आघाडी स्थापन केली आहे. जात्यंध शक्तींना विरोध करताना मतविभागणी होऊ नये, असा आघाडीचा प्रयत्न राहणार असून, आघाडीतर्फे 20 सप्टेंबर रोजी पुण्यात संयुक्त मेळावा घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल’, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: