परभणीमराठवाडाराज्य

‘म’ मासिक पाळीचा कार्यक्रमात एचएआरसी संस्थेतर्फे पिंगळी येथील 250 किशोरवयीन मुलीना केले सॅनिटरी पॅडचे वाटप व समुपदेशन

Spread the love
महाविश्व न्यूज ,(परभणी)-होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) परभणी या संस्थेतर्फे दि 11 सप्टेंबर बुधवार  रोजी जिल्हा परिषद शाळा पिंगळी व  गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंगळी ता जि परभणी येथे  23 वा ‘म’ मासिक पाळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा पिंगळी व  गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंगळी ता जि परभणी येथील इयत्ता 7वि ते 12वि तील जवळपास 300 किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती।
या प्रसंगी एचएआरसी संस्थे तर्फे ज्यांना पाळी येते अश्या 250 किशोरवयीन विद्यार्थिनींना मासिक पाळीतील स्वच्छतेच्या दृष्टीने 1 महिने पुरतील इतके पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड व जनजागृतीविषयक माहितीपत्रक चे  मोफत वाटप कारण्यात आले।
जागेची अडचण असल्याने एकाच गावात 2 वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करावे लागले त्यामुळे एचएआरसी टीम ला एलसीडी प्रोजेक्टर लावणे पासून अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला।
 किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी, समज गैरसमज इत्यादी विषयी जनजागृतीची खूप गरज आहे। म्हणूनच सध्या एचएआरसी संस्थे तर्फे संपूर्ण परभणी जिल्ह्यात तालुका व ग्रामीण भागात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, जिल्हा परिषद शाळेत असेच जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे।
  मागील केवळ 8 महिन्यात 23 विविध शाळेत विशेषतः ग्रामीण भागात आयोजित कार्यक्रमातून आजवर 2330 ग्रामीण भागातील गरजू किशोरवयीन मुलींना व अनाथ मुलींना सॅनिटरी पॅड पुरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: