अर्थव्यवस्थारणधुमाळीराज्य

नोटाबंदीसारखीच आर्थिक मंदी मानवनिर्मित : प्रकाश आंबेडकर

Spread the love

 

लातूर : देशात आर्थिक मंदी आली नसून ती लादण्यात आली आहे. नोटाबंदीसारखीच ही मानवनिर्मित मंदी असून, गोरगरीबांचे कंबरडे मोडण्याचे हे षडयंत्र आहे. सामान्य माणसाचे जीवन अशांत करण्याचा हा प्रकार आहे. ज्या देशात ४० टक्क्यांपेक्षा अधिक लोक दारिद्य रेषेखाली जीवन जगत आहेत. त्या देशामध्ये मंदी येतेच कशी, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही अडीचशे जागा जिंकू असे वक्तव्य करून मतदारांना गृहित धरले आहे. यातून त्यांनी मतदारांचा अवमानच केला आहे, अशी टीका त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन रॅलीत रविवारी केली. वंचित घटकातील कुटुंब आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्नांच्या विवचनेत अडकला पाहिजे, असे प्रयत्न सुरू आहेत. ज्या दिवशी हे सरकार आपण पाडू त्या दिवशी मंदी संपुष्टात येईल. जेवढे दिवस सरकार सत्तेत सहील तेवढे दिवस ही मंदी कायम राहील. यातून  बाहेर पडण्यासाठी आता महाराष्ट्रातले सरकार उलथून टाका. महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही, याची काळजी घ्या, असे आवानही त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: