पश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे पाणी शुद्ध असणे गरजेचे :आण्णासाहेब महाडिक

Spread the love

चंद्रकांत चौंडकर, (पुरंदर -पुणे) – : पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथे श्री सिद्धेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर खेसे यांच्या वतीने नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शिंदवणे (ता.हवेली) गावचे विद्यमान सरपंच व उद्योजक आण्णासाहेब महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत नायगावच्या माजी उपसरपंच सविताताई खेसे व सिद्धेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष सिद्धेश्वर खेसे यांनी केले.त्यामुळे आता नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार आहे. जल जीवन आहे’, ही शिकवण देत पाण्याचे महत्व अगदी लहानपणापासून आपल्या मनावर बिंबविले जात असते.

आपण जे पाणी पितो ते शुद्ध नसेल, तर तेच पाणी शरीराला अपायकारक ठरून निरनिराळ्या रोगांसाठी कारणीभूत ठरू शकते. आरोग्याच्या दृष्टीने आपण पीत असलेले पाणी हे शुद्ध, किटाणू विरहित असणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी आपण फिल्टर्सचा वापर करीत असतो.पोटाच्या होणा-या रोगांमध्ये बरेच रोग दूषित पाण्यामुळे होतात,असं निदर्शनास आलं आहे.

त्यामुळे आपण जे पाणी पितो ते आरोग्यदृष्टय़ा पिण्यालायक आहे की नाही, हे बघणं आणि त्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक ठरतं.याच कारणासाठी हल्लीच्या स्वयंपाकघरांमध्ये असो किंवा शाळा,कार्यालयात असो वॉटर फिल्टर हे एक आवश्यक उपकरण बनलं आहे. यामुळे निश्चित नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदा होईल असे शिंदवणे गावचे सरपंच आण्णासाहेब महाडिक यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विजय कोलते,माजी सरपंच शांताराम कोलते,संभाजी कोलते,उपसरपंच याकूबभाई सय्यद,माजी उपसरपंच सुनिल कोलते,तसेच बाळासाहेब कुंजीर,विश्वास महाडिक,हरिदास कोलते,सदाशिव कोलते,गणेश कोलते,संतोष पवार,पप्पू वायकर,सदाशिव कटके,अरुण कोलते,सुरेश कोलते,मधुकर अडसूळ,संभाजी कोलते,संजय कोलते,बाबूशेठ कोलते,जवाहरलाल खेसे,बारीकराव खेसे,विलास खेसे,प्रदीप खेसे,मल्हारी कड,अशोक होले,शिवाजी कड,शांताराम कड, दिलिप मोरे,संजय होले,संपत कड,बबन खेसे,दत्ताभाऊ कड,वसंत खेसे,हरिदास खेसे,संदिप ठवाळ,चांगदेव चौंडकर,संतोष गायकवाड,बाळासाहेब कड,चंद्रकांत चौंडकर,अल्लाउद्दीन सय्यद,रियाज सय्यद,दिपक खेसे,राहुल कड,नितीन कड आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: