पश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

सासवड येथील दळवी हॉस्पिटलमध्ये मोफत हर्निया तपासणी शिबिर संपन्न

Spread the love

चंद्रकांत चौंडकर, (पुरंदर -पुणे) – डॉ दुसाने हरणे क्लीनिक पुणे आणि दळवी मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने पुरंदर तालुक्यातील सासवड येथील  दळवी हॉस्पिटलमध्ये मोफत हर्निया तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये १७० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.यामध्ये ७० रुग्णांना हर्नियाचा प्रादुर्भाव दिसून आला.

त्यासाठी ३० टक्के सवलतीमध्ये सोनोग्राफी करण्यात आली.रक्त लघवी तपासण्यात आली.२२ रुग्णांची सर्जरी करण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर दुसाने यांनी दिली.या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप आबा यादव यांनी केले. उपस्थितीमध्ये दुसाने हार्ले क्लीनिकचे सर्व व सहकारी डॉ सिंग,डॉ आनंद कुलकर्णी, प्रमोद पाध्ये,श्रीमती विक्टोरिया पिल्ले, पुरंदर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ राजेश दळवी,डॉ खाडे आदी उपस्थित होते.दळवी हॉस्पिटलच्या संचालिका मंजुषा दळवी,डॉ आहेर,डॉ सुनील भोसले ,प्रीती ओहाळ व दळवी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: