बुलढाणारणधुमाळीराज्यविदर्भ

कृउबा समिती बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचे भूमिपूजन प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संपन्न

Spread the love

प्रविण बुधवत, (बुलढाणा) – कृउबा समिती बुलडाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचा भूमिपूजन सोहळा भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या शुभहस्ते तसेच मा जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कृउबा समिती सभापती बुलडाणा, शिवसेना उप जिल्हा प्रमुख संजय गायकवाड, भोजराज पाटील, मा जि प्र धीरज लिंगाडे, ता प्र डॉ मधुसुदन सावळे, रामदास चौथनकर, उपसभापती पंजाबराव पाटील, सचिव वनिता साबळे, संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी कृउबा समिती बुलडाणा येथे सभापती जालिंधर बुधवत यांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचे अनेक विकासकामे संपन्न झाली. या पुढेही बाजार समिती मध्ये शेतकरी हितार्थ विकासकामे पूर्णत्वास जातील याबद्दल विश्वास व्यक्त करण्यात आला.

या विकासपर्वात सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच सभापती जालिंधर बुधवत यांनी आभार व्यक्त केले. यावेळी बुलडाणा मोताळा तालुक्यातील शेतकरी बांधव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: