इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यशिक्षण

युवराज साबळे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

Spread the love

धनंजय पोटदुखे, (दिघी-पुणे) – दिघी येथील रामचंद्र गायकवाड प्राथमिक ,माध्यमिक व जुनिअर कॉलेज मधील साबळे युवराज यशवंत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अण्णा अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती या ठिकाणी केले होते. महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती यांच्यावतीने पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी हरिचंद्र गायकवाड (अध्यक्ष मुख्याध्यापक संघ ) तसेच भरत रसाळे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेवक समिती) तसेच राजेंद्र शिळीमकर (नगरसेवक पुणे मनपा) हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

मा. युवराज साबळे सर यांचे प्रजासत्ताक दिनी संचलन अगदी उत्कृष्ट व सुंदर असते. तसेच ते विज्ञान विषयाचे उपक्रमशील शिक्षक आहेत . विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचे उत्कृष्ट कौशल्य त्यांनी जोपासले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ते नेहमी तत्पर असतात. विज्ञान प्रदर्शनात त्यांचा उपक्रमशील सहभाग दिसून येतो. आदर्श अध्यापन पद्धती, उत्कृष्ट भाषण, कोणतेही काम मनापासून करण्याची तयारी असते. त्यांच्या या सर्व कामाचे चीज म्हणून आज आदर्श शिक्षक या पुरस्काराने त्यांना गौरविले आहे.

साबळे युवराज यशवंत यांचे नवजीवन शिक्षण संस्थेकडून संस्थापक दत्तात्रय गायकवाड, सर्व संचालक, विद्यालयाचे प्राचार्य विनोद वाळके सर, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: