इतरगुन्हेविश्वराज्यवर्धाविदर्भ

अल्पवयीन मुलीची शहरलगत हत्या; वर्ध्यातील हिंगणघाट येथील प्रकार

Spread the love

दशरथ ढोकपांडे, (हिंगणघाट-वर्धा) – शहरालगत असलेल्या रिमडो शिवारातील द्वारकानगरीला लागून असलेल्या सारडा लेआऊट मध्ये अल्पवयीन मुलीचे प्रेत मिळाल्याने हिंगणघाट शहरात खळबळ माजली आहे.

वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहरातील स्थानीय माता मंदिर वार्डमधील साक्षी शरद सुरकार अंदाजे वय 17 वर्ष अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. शहरालगत असलेल्या रिमडोह गावलंगत मधील द्वारकानगरीला लागून असलेल्या सारडा लेआऊट मध्ये हत्या करण्यात आल्याची माहिती रिमडोह येथील स्थानिक नागरिकांनी सकाळी हिंगणघाट पोलिस स्टेशनला दिली.

ही हत्या रात्री झाली असावी अशी माहिती आहे. मुलीच्या टी-शर्ट वरती रक्ताचे डाग असून नेमकी हत्या कोणत्या कारणावरून व कशी झाली याची माहिती अजून पर्यंत समोर आलेली नसून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरालगत असलेल्या शहरातील बाहेरील लेआऊट वरती तरुण मुला व मुलींचा नेहमीच विहार असतो तेव्हा हे लेआउट सुद्धा शहराच्या बाहेर आहे त्या मुळे प्रेम प्रकरण किंवा अन्य गोष्टी साठी ही हत्या झाली असावी अशी चर्चा गावात सुरु असून समोरील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: