इतरक्रीडापश्चिम महाराष्ट्रपुणेयुथ कट्टाराज्यशिक्षण

रामचंद्र गायकवाड विद्यालयाचा जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत दबदबा

Spread the love

धनंजय पोटदुखे, (निगडी-पुणे) – पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हॉलीबॉल या खेळाची स्पर्धा सिटी प्राईड स्कूल, निगडी प्राधिकरण येथे संपन्न झाली.

या स्पर्धेमध्ये दिघी येथील रामचंद्र गायकवाड विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. त्यामध्ये 14 वर्षे वयोगट मुले द्वितीय क्रमांक, मुली तृतीय क्रमांक, 17 वर्षे वयोगट मुले तृतीय क्रमांक, 19 वर्षे वयोगट मुले तृतीय क्रमांक, मुली द्वितीय क्रमांक पटकाविला.

तीनही वयोगटातील विजेत्या संघातील खेळाडूंचे आणि मार्गदर्शक, विद्यालयाचे प्राचार्य वाळके सर यांचे नवजीवन शिक्षण संस्थेचे संस्थापक दत्तात्रय गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष विनायक वाळके, सचिव रवींद्र गायकवाड, सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी हार्दिक अभिनंदन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: