पश्चिम महाराष्ट्रपुणेमनोरंजनराज्य

३१ व्या पुणे फेस्टिवलमध्ये उगवते तारे भाग 2 संपन्न

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – ३१व्या पुणे फेस्टिवलमध्ये उगवते तारे हा वय ७ ते १४ वर्षे या वयोगटातील उगवत्या व नवोदित बाल कलाकारांसाठी आयोजित कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडला. यंदा खूप मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे उगवते तारे कार्यक्रम ३ भागात सादर करण्यात येत आहे.

दि १० सप्टेंबर रोजी झालेल्या ‘उगवते तारे भाग 2’ मध्ये १०० हून अधिक बाल कलाकारांनी भाग घेतला होता. या बाल कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी पालक व रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. यामध्ये भारतीय शास्त्रीय नृत्य, वेस्टर्न डान्स, पोवाडा, नाट्यछटा, सुगम संगीत, शास्त्रीय गायन, सिंथेसायझर, सतार, तबला वाद्यवादन असे विविध कला प्रकार सादर करून या बाल कलाकारांनी प्रेक्षकांचे वन्स मोर मिळवले.

प्रारंभी ‘उगवते तारे’ चे संयोजक रवींद्र दुर्वे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. पुण्यातील बाल कलाकारांना हक्काचे व मानाचे व्यासपीठ मिळावे यासाठी पुणे फेस्टिवलतर्फे हा ‘टॅलेंट सर्च’ उपक्रम गेली अनेक वर्षे चालू आहे.

पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत ३०० हून अधिक बाल कलावंत यात सहभागी होतात ही समाधानाची बाब आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना अभ्यासाबरोबरच विविध कलांमध्ये पारंगत होण्यासाठी गायन वादन नृत्य याचे पारंपारिक शिक्षण देण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: