पश्चिम महाराष्ट्रपुणेमनोरंजनराज्य

दिलखेचक अदाकारी आणि ठसकेबाज लावण्यांनी रंगला लावणी महोत्सव

Spread the love

0महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – लय, दिलखेचक अदाकारी,ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावले, ठसकेबाज लावण्या त्याला  महिलांनी शिट्या वाजवून आणि नाचून दिलेला प्रतिसाद  अशा उत्साहपूर्ण वातावरणात खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला लावणी महोत्सव पार पडला.

पुणे फेस्टिवल अंतर्गत शिवरत्न प्रॉडक्शन प्रस्तुत बालाजी निर्मित ‘तुमच्यासाठी काय पण’ हा खास महिलांसाठी लावणी महोत्सव बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला महिलांनी प्रचंड गर्दी करून उस्फूर्त प्रतिसाद दिला. अकलुजच्या लावणी महोत्सवात सलग १३ वर्षे पारितोषिक विजेता संघ म्हणून असलेल्या  या ग्रुपने विविध लावण्याचे प्रकार सादर केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून  या महोत्सवाला  सुरुवात झाली.  पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार
गोयल, डॉ. सतिष देसाई, महाराष्ट्र  महिला काँग्रेसच्या  संगीता तिवारी,  इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या तरिता शंकर,
दिपाली पांढरे, संयोजिका कुदळे, मोहन टील्लू, श्रीकांत कांबळे हे यावेळी उपस्थित होते.

दीपाली पांढरे आणि संयोजिका कुदळे यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. या कार्यक्रमाचे निर्माते व दिग्दर्शक योगेश देशमुख आणि लावण्यवती पूनम कुडाळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुनम कुडाळकर यांनी आपल्या अदाकारीने सादर केलेल्या ‘नाक डोळे छान, रंग गोरा गोरापान.. या लावणीला महिला
रसिकांनी डोक्यावर घेतले. ज्योती मोरे यांनी सादर केलेल्या  ‘चांदनं चांदनं झाली रात… या ठसकेबाज लावणीला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीपाली व निकिता यांनी सादर केलेल्या ‘खेळताना रंग बाई होळीचा..’यालाही महिलांनी दाद दिली.

पूनम कुडाळकर यांनी आपल्या एका वेगळ्या अदाकारीने सादर केलेल्या’,सैराट’या चित्रपटातील ‘येड लागलं..या गाण्याला तसेच ‘शांताबाई’ आणि ‘तुला फिरवली माझ्या गाडीवर’.. या गाण्यांना भरगच्च भरलेल्या नाट्यगृहातील महिलांनी डोक्यावर घेतले.

योगेश देशमुख आणि अथश्री व पूजा  यांनी सादर केलेला ‘नटरंग उभा…’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे निर्माता व नृत्य दिग्दर्शक योगेश  देशमुख हे आहेत. संगीत संयोजन अमोल पांढरे, ढोलकीची साथ नितीन प्रधान यांनी दिली तर निवेदन समीर पठाण यांनी केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: