उत्तर महाराष्ट्रऔरंगाबादकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईरणधुमाळीराज्यविदर्भसामाजिक

जे आमच्या सोबत येणार त्यांना सोबत घेणार – प्रकाश आंबेडकर

Spread the love

पुणे –  वंचित बहुजन आघाडी सोबत एमआयएम चे महाराष्ट्रातील अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी युती तोडल्याची घोषणा केली मात्र काल प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात घेतलेल्या  पत्रकार परिषदेत जे वंचित बहुजन आघाडी सोबत येतील त्यांना सोबत घेणार असे जाहीर केले. जो पर्यंत असदुद्दीन औवेसी यांच्या कडून काही निर्णय कळवलं जात नाही तोपर्यंत “वंचीत बहुजन आघाडी” ची एमआयएम सोबतची आघाडी कायम असल्याचे सांगितले.

भाजप हे ब्लॅकमेलिंगचे राजकारण करत असून विरोधकांना भीती दाखत आहे असा आरोप या वेळी  प्रकाश आंबेडकरांनी केला काँग्रेस वर हल्लाबोल केला  काँग्रेस चे नेते भाजप सोबत आघाडी करत आहे व सरकारची कारवाई  टाळण्यासाठी छुपी मदत करत आहे असे सांगून आंबेडकरांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस-राष्ट्रवादीच भाजपची बी टीम असून यांच्यासोबत युती करण्याची इच्छा नाही असेही स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: