उत्तर महाराष्ट्रऔरंगाबादकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडायुथ कट्टारणधुमाळीराज्यविदर्भसामाजिक

महाराष्ट्र एमआयएममध्ये पडली फुट ! खा. ईमतियाज जलील विरोधात बंडखोरी

Spread the love

पुणे – एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलेले खा.ईमतियाज जलील यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षतील नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी सोबतची युती तोडण्याच्या निर्णयाला विरोध करत बंडखोरी केली आहे.

एमआयएमच्या माजी सांगली जिल्हा अध्यक्ष शाकीर तांबोळी, पुणे शहर माजी अध्यक्ष जुबेर शेख यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत खासदार जलील यांची वंचित बहुजन आघाडी सोबतची युती तोडण्याच्या निर्णया बाबत भुमिका संशयास्पद आहे. असा आरोप करण्यात आला .

जलील यांनी औवेसी यांची दिशाभूल करत सुरूवाती पासूनच वेगळे लढायच ही संशयास्पद भूमिका जलील का घेत आहेत असा सवाल करत जलील यांच्यावर जोरदार टिका केली.

ईमतियाज जलील लोकसभेला निवडून आल्यानंतर विधानसभेला एमआयएममध्ये दुसऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला आमदार म्हणून निवडून आणायचे नाही, कोणालाही मोठे होऊ द्यायचे नाही, म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी वंचित बहुजन आघाडी सोबत युती तोडण्याचा निर्णय परस्पर पक्षाचे अध्यक्ष औवेसी व महाराष्ट्रातील नेत्यांना विश्वासात न घेता घेतला असल्याचा आरोप केला.

यावेळी सांगली, पुणे जिल्ह्यातील एमआयएमचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: