गडचिरोलीराज्यविदर्भ

अखेर 24 तासानंतर मुलचेरा-आष्टी मार्गावर रहदारी सुरू

Spread the love

महााराष्ट्र विश्व न्यूज, (गडचिरोली) – जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा कहर होता. काल सकाळपासूनच मुलचेरा तालुक्याचा दुसऱ्यांदा जगाशी संपर्क तुटला होता,आजचा दुसऱ्या दिवशी दीना नदीवरील पूर ओसरल्यावर 09 वाजेवापसून मुलचेरा-आष्टी मार्गावरील रहदारी सुरू झाली आहे.

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा दक्षिण जिल्ह्यातील भामरागड, मुलचेरा, एटापल्ली,सिरोंचा,अहेरी या पाचही तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने काल सकाळ पासून अनेक गावांचा जगाशी संपर्क तुटला होता.
काल सकाळपासूनच मुख्य मार्ग बंद असल्याने गडचिरोली आणि चंद्रपूर कडे जाणाऱ्या प्रवाश्यांना आलापल्ली कडे धाव घ्यावा लागला.अजूनही काही ठिकाणची परिस्थिती मात्र,जैसे थे असून पुन्हा पावसाची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: