इतरउत्तर महाराष्ट्रकोकणपर्यावरणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईरणधुमाळीराज्यविदर्भसामाजिक

संतापकीय – एक ‘सामना’- ‘वाघाचा ‘बछडा’ विरुद्ध ‘द लायन किंग’ , पण जंगल (‘आरे’) वाऱ्यावर…

Spread the love

लेखक हे महाराष्ट्र विश्व न्यूजचे नियमित वाचक तसेच पर्यावरणविषयक काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत (माधव पाणी ८७९६५७२७६६ BE, LLb, MBA (Finance), MA(Philosophy), Dip. In Journalism, Phd Appeared)

अहो मुंबईकर, आलात का पाण्यातून बाहेर ?
सवयच आहे मुंबईकरांना पाण्याची आणि संकटांची.काल पूर्ण मुंबई पाण्यात असूनही मुंबईच्या सगळ्याच आई-भगिनींनी आज सकाळी घरातल्या तुळशीला पाणी नक्कीच दिले असेल.

कॉमन मॅनसाठी तुळस काय आणि झाडे काय , दोन्हीही समान आणि तितकेच प्यारे. तर ह्या प्यारे ‘आरे’मधील २७०२ झाडे मेट्रोसाठी तोडली जाणार आहेत.खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रत्येक निर्णय हा त्यांची महत्वकांक्षा प्रकट करत असतो.महाराष्ट्रात त्यांच्याइतका दुसरा महत्वकांक्षी माणूस शोधून सापडणार नाही ( भाजप मध्ये मला जायचे नाही ).राजसाहेब,अजित पवार आणि आदित्य ठाकरे त्यांच्या रेसमध्ये आहेत हे विसरता काम नये.

राज साहेबांनी ब्लु-प्रिंटमध्ये “आरे”चा आधीच उदो-उदो केला आहे.सामान्य माणसांचा आणि सामाजिक संस्थांचा विरोध कधीच ग्राह्य धरला जात नाही म्हणून काही सेलिब्रिटींची नावं घेतो त्यात लता मंगेशकर,अमित ठाकरे,श्रद्धा कपूर,दिया मिर्झा,रणदीप हुडा ह्यांनीही आरेच्या झाडे तोडण्यासाठी विरोध केला आहे. इंडियन इन्स्टिटयूट सायन्स आपल्या एका अहवालात असं सांगते कि १९७० साली मुंबईमध्ये एकूण क्षेत्रफळाच्या ३५ टक्के झाडे होती आणि आजरोजी ती १३ टक्क्यापेक्षा खाली आली आहे.आज आरेची २७०२ असं करत हळू हळू मुंबईमध्ये झाडेच शिल्लक राहणार नाही. बिचारा मुंबईचा कॉमन मॅन रोजच्या कामात इतका व्यस्त असतो कि आम्हाला आरेची झाडे हवी आहेत हे तो फक्त व्हाट्सएप्प आणि फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त करतो.जवळपास ८०००० नागरिकांनी सह्यांच्या माध्यमातून आरे वृक्षतोडीला विरोध दर्शविला आहे.त्यात आघाडीवर आदित्य ठाकरे आहेत कारण आदित्य ठाकरेंनी मुंबईत इलेकट्रीक टांगा,५०० इलेकट्रीक बस,महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी इत्यादी पर्यापूरक योजना अंमलात आणण्याचा पन केलाय.आणि हो, त्यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा हि पर्यावरणाच्या आणि जनतेच्या भल्याची असेल तर हरकत काय ?

मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असतानाही आणि विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंचा आरेमधील झाडे तोडण्यासाठी विरोध असतानासुद्धा वृक्ष प्राधिकरण समितीने झाडे तोडण्याची परवानगी दिली.समितीमध्ये तज्ज्ञ नेमण्याचे अधिकार तसे बऱ्यापैकी शिवसेनेलाच आहेत पण समितीमधील दोन वृक्षतज्ज्ञांनी आपली फसवणूक करुन वृक्षतोड करण्याच्या बाजूने मत द्यावयास लावल्याचा आरोप करत राजीनामा दिला आहे.

थोडक्यात काय, मेट्रोचे काम कोण थांबवतो त्यालाच मी थांबवतो हे राज्य सरकारचे धोरण दिसत आहे.सामान्य जनता आज ना उद्या “आरे-कारे” सगळं विसरून जाऊन राज्य सरकारने जोरात प्रचार करीत असलेल्या “मुंबई काही मिनिटात” अशे स्लोगन असलेल्या मेट्रोचा आनंद घेणार आहे.फक्त २७०२ झाडे कापली जाणार आहेत पण आम्ही ३३ कोटी झाडे लावली आहेत हेसुद्धा मुख्यमंत्री साहेब ठासून सांगतील. ‘फक्त मुंबईच्याच झाडांची-पर्यावरणाची नाही तर जगाच्या पर्यावरणाची काळजी आमच्या पक्षाचे आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांना आहे कारण त्यांना संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण पुरस्कारही मिळाला आहे’ हेसुद्धा मुख्यमंत्रीसाहेब अगदी छाती ठोकून सांगतील.थोडक्यात काय,मुंबईची फुफुसं असलेल्या ‘आरे’वर कुह्राड पडणार हे नक्की.मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षा जिंकणार.आदित्य ठाकरेंनी ‘आरे’ वृक्षतोडीला विरोध केला खरा पण हिंदुहृदय सम्राटांसारखी ठाम भूमिका न घेतल्याने आपल्याच शिवसैनिकांवर थोडा अविश्वास दाखवला.

आज ना उद्या मुख्यमंत्री व्हायचंय म्हणजे आजी मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलवती ठेवली पाहिजे.तसे आजी मुख्यमंत्रीसाहेब मुत्सद्दी आहेत.सामाजिक संस्था आणि जनभावनेचा आदर करीत मी आदेश देतो कि “आरेच्या झाडांची कत्तल होणार नाही,कारशेड कांजूरमार्गकडे हलविण्यात येईल” आणि योग्य टायमिंग साधून हे जाहीर करायला मुख्यमंत्रीसाहेब मागेपुढे पाहणार नाहीत.कदाचित असं जाहीर करून आरेच्याच नाहीतर देवेंद्र फडणवीस साहेब मुंबईकरांच्या मनाचे राजे होतील.पण आदित्य ठाकरेंनी हा विषय खरंच मनावर घेतला तर शिवसैनिकांच्या साथीने ते उभ्या महाराष्ट्राला शिंगावर घेउ शकतात.आरेच्या गेटजवळ आदित्य ठाकरे नुसते उभेजरी राहिले तरी कोणाची हिम्मत होणार नाही तिथे मेट्रो-कारशेड उभारण्याची.

खरंतर आदित्य ठाकरेंनी ते करूनच दाखवावे कारण शेवटी कोणाची महत्वकांक्षा सरस हे महत्वाचे बाकी सब झूट.कितीतरी येतील आणि विरोध करून जातील पण आज देवेंद्र साहेबांच्या महत्वकांक्षेला टक्कर देणारा माणूस महाराष्ट्रात कोण असेल तर तो म्हणजे आदित्य ठाकरे,हो हो ,हा वाघाचा बछडा,शिवसेनेचा वाघ.

चाणक्य प्रशांत किशोर हे सोशल इंजिनिरिंग करण्यात सफल होतील पण शिवसेनेचा बाणा जपण्याचे काम हे शिवसैनिकालाच करावे लागेल. खुद्द शिवाजी महाराजांनी फर्मान काढले होते कि ‘शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावाल तर याद राखा”.महाराजांचा हा पर्यावरणाचा फर्मान शिवसैनिकांनी डोक्यावर घेण्याची हीच खरी वेळ आहे. आणि ‘आरे’च्या निमित्ताने हि नामी संधी शिवसेनेला आली आहे.तशीही मुंबई पावसाच्या पाण्याने बंद पडते.आदित्य ठाकरे यांनी आरेच्या झाडांसाठी देशाची आर्थिक बंद पाडली तर हा धक्का फक्त मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला नसेल तर ह्याचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटतील. आदित्य ठाकरे याद्वारे सामान्य जनतेच्या मनामध्ये आपली जागा बनवतील आणि मुख्यमंत्री बनण्याच्या शर्यतीत बुलेट ट्रेन प्रमाणे आघाडीवर येतील.त्यात ‘सामना’ची दखल अगदी राष्ट्रीय स्तरावरची माध्यमे घेत असतात.उद्धव ठाकरे साहेब हे संजय राऊत यांच्या लेखणीचा वापर करून ‘सामना’मधून सामान्य माणसांची आणि शिवसैनिकांची खदखद बाहेर काढत असतात.

आरेच्या झाडांना ‘वाघाचा बछडा’ विरुद्ध ‘द लायन किंग’चा सामना पाहावा लागेल.हा सामना येत्या काही दिवसात कॉमन मॅनलासुद्धा पाहावा लागावा हीच अपेक्षा.थोडक्यात काय तर, जो झाडांना वाचवेल तो कॉमन मॅनला वाचवेल आणि तोच खरा आरेच्या जंगलावर , मुंबईवर आणि महाराष्ट्रावर राज्य करेल.

ता.क. – मनसे,राष्ट्रवादी,काँग्रेस,आप,वंचित ह्या पक्षांनी काही नेते/कार्येकर्ते आरेच्या “फक्त” २७०२ झाडांसाठी शहीद केले तर इथूनपुढे जगाच्या अंतापर्यंत महाराष्ट्रात निवडणुका ह्या फक्त आणि फक्त ‘पर्यावरण’ ह्या विषयावर जिंकल्या जातील.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: