इतरकोल्हापूरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यशिक्षणसामाजिक

दिघी येथील गायकवाड शाळेने कोल्हापूर येथील शाळेला केली 50 हजार रुपयाची शैक्षणिक साहित्याची मदत

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (दिघी-पुणे) – . गेल्या काही दिवसांपूर्वी सांगली, कोल्हापूर या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातले होते. त्या पुराच्या पाण्यामुळे अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले.

त्यापैकी सांगली-कोल्हापूर सीमेवर असलेली दि हिंद एज्युकेशन सोसायटी, मिरज या संस्थेची श्री गणेश हायस्कूल_ , गणेशवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर ही एक शाळा. या शाळेच्या वर्गखोल्या मध्ये कृष्णा पंचगंगा नदीचे अंदाजे 8 ते 10 फूट पाणी होते. त्यामुळे या शाळेतील वर्गखोल्या, भौतिक सुविधा, फर्निचर, शालेय रजिस्टर्स या सर्वांचे अतोनात नुकसान झाले.

लगेच माणुसकीच्या नात्याने महाराष्ट्रातून या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके दप्तरे इत्यादींची मदत सुरू झाली. मात्र या शाळेतील परिस्थितीची कल्पना आपल्या नवजीवन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विशेषता संस्थापक श्री दत्तात्रय आबा गायकवाड , सचिव श्री रवींद्र गायकवाड व उद्योगपती उदयशेठ गायकवाड यांना समजली.

नेहमीच्या दातृत्वा च्या भूमिकेतून संस्थेने या शाळेला फर्निचर, टेबल, खुर्च्या, क्रीडा साहित्य, प्रयोग शाळेतील साहित्य असे एकूण अंदाजे 50 हजार रुपयांचे प्रत्यक्ष साहित्य दिले. त्याबद्दल त्या संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी आपल्या संस्था व शाळेने केलेली मदत पाहून खूप आनंद व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. कारण त्यांना दररोज खेळण्यासाठी नवीन साहित्य, प्रयोग करण्यासाठी नवीन साहित्य, सर्व गुरुजनांना बसण्यासाठी व काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या टेबल-खुर्च्या मिळालेल्या होत्या. अशा प्रकारची आवश्यक वस्तू रुपी मदत केल्याबद्दल नवजीवन शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, रामचंद्र गायकवाड शैक्षणिक संकुलातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच दिघी येथील दानशूर व्यक्तींचे कोल्हापूर र्ये थील शाळा व संस्थेने मनापासून आभार मानले. संस्था व शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: