इतरबुलढाणारणधुमाळीराज्यविदर्भसामाजिक

मलकापूर येथे मतिमंद विद्यालयात रासप तर्फे वाढदिवस साजरा

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (मलकापूर-बुलढाणा) – राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या संकल्पनेतून रासपचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद ताहीर भाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मलकापुरातील जैन महिला मंडळ द्वारा संचालित मतिमंद प्रशिक्षण विद्यालयात खाऊ वाटप करण्यात आले.

समाजामध्ये वावरत असताना समाजातीलच असलेले मतीमंद विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासोबत काही वेळ घालवून त्यांनाही ही आपल्या सोबत आपल्या आनंदात सामील करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सय्यद ताहेर यांचा वाढदिवस जैन महिला मंडळ द्वारा संचालित मतिमंद विद्यालय मलकापूर येथे साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींना खाऊवाटप करून त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न राष्ट्रीय समाज पक्षातर्फे करण्यात आला मलकापूर शहरात अनेक वर्षांपासून असलेल्या मतिमंद विद्यालयात सदर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण तसेच राहण्याची सोय उपलब्ध असून संस्था या विद्यार्थ्यांची देखभाल उत्कृष्टरित्या करत असल्याचे व व अशीच सेवा संस्थेकडून नेहमीच घडत राहो यासाठी धनश्रीताई काटीकर यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापिका शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद ताहेर ,तालुकाध्यक्ष खाजा कुरेशी, रोशन मोहेकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष जुनेद अशरफ, संतोष वानखेडे शहराध्यक्ष , गोविंद वानखेडे तालुका उपाध्यक्ष, विलास भाऊ तायडे राजू तायडे, अनंता दिवनाले तालुकाध्यक्ष, प्राध्यापक प्रकाश थाटे, कैलास सुषिर, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपण्यापूर्वी खालील ९ कुपन कोड पहा आणि ८०% पर्यंत बचत करा!

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: