परभणीमराठवाडाराज्य

नांदेड-औरंगाबाद नवीन रेल्वेचे परभणीत जोरदार स्वागत

Spread the love

महाराष्ट्र विश्‍व न्यूज, (परभणी) ः- आजपासून सुरु करण्यात आलेल्या नांदेड-औरंगाबाद विशेष दैनंदिन रेल्वेचे परभणी स्थानकावर मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघातर्फे ढोल ताशे वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी सदर रेल्वेचे दोन्ही चालक व परभणीचे स्टेशन मास्तर देवीदास भिसे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व प्रवाशी जनतेला पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

नांदेड-औरंगाबाद या नवीन रेल्वेला पहिल्याच दिवशी मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता सदर रेल्वेला आणखी 7 डब्बे वाढवून एकूण 15 कोचेसची सुविधा देण्यात यावी. त्यात एक एसी आणि चार आरक्षण कोचेसची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सकाळी 4 च्या देवगिरी नंतर दुपारी 12 च्या सचखंड एक्सप्रेस पर्यंत औरंगाबाद येथून परभणीेकडे जाण्यासाठी रेल्वे नाही, हे लक्षात घेता सकाळी 8 ला औरंगाबाद-अकोला दरम्यान नवीन मेमो लोकल तात्काळ सुरू करण्यात यावे.

बहुप्रतिक्षित नांदेड-मुंबई आणि औरंगाबाद-नागपूर या दोन्ही नवीन दैनंदिन एक्सप्रेस गाड्यांना तत्काळ सुरू करण्यात यावे. मनमाड-परभणी, पूर्णा-अकोला आणि परभणी-परळी दरम्यान नवीन दोहेरीकरणला मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाचा सुरू करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा सुरेश नाईकवाडे, डॉ राजगोपाल कालानी, श्रीकांत गडप्पा, हर्षद शहा, शंतनु डोईफोडे, किरण चिद्रवार, रितेश जैन, नयन गुप्ता, उमाकांत जोशी, कदीर लाला हाशमी, अड.अटल पुरुषोत्तम, सुनील जोशी, दयानंद दिक्षीत, अमित कासलीवाल, शिवप्रसाद तोष्णिवाल, नितीन कदम, अनिल देसाई इत्यादींनी केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: