उस्मानाबादमराठवाडारणधुमाळीराज्य

उस्मानाबाद मध्ये रंगणार नेता विरुद्ध कार्यकर्ता सामना..!

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(उस्मानाबाद) – उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार राणाजगदीश सिंह पाटील यांनी नुकताच सोलापूर मध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी चा उमेदवार कोण असणार याची जोरदार चर्चा रंगली आहे.

आता या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान नेते अमित शिंदे यांनी पाटलांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. पक्ष स्थापने पासून अमित शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. काही काळ आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद संभाळलेलं असल्याने संघटनेचा दांडगा अनुभव आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

अमित शिंदे हे उस्मानाबाद चे माजी नगराध्यक्ष असून सलग १५ वर्षे ते नगरसेवक होते. सध्या त्यांच्या पत्नी उस्मानाबादच्या नगरसेविका आहेत. कार्यकर्त्यांना ताकद देणारा माणूस म्हणून ते कार्यकर्त्यांमध्ये चांगले परिचित आहेत. यामुळे उस्मानाबाद ची लढत यंदा रंगतदार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: