गरजवंतमदतीचा हातरणधुमाळीराज्यसामाजिक संस्थासोलापूर

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातूनच होणार लोकशाहीचे सामाजिकीकरण – गोविंद दळवी

Spread the love

सोलापूर –   वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये बारा बलुतेदार, १८ अलुतेदार यांच्यासह इतर दुर्बल तीस जातीतील समाजबांधवांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे वंचितच्या माध्यमातूनच लोकशाहीचे खरे सामाजिकीकरण करण्यात येणार असल्याचे मत वंचित आघाडीच्या मायक्रोओबीसी विभागाचे प्रदेश महासचिव गोविंद दळवी यांनी व्यक्त केले.

सत्ता संपादन अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या मेळाव्यासाठी दळवी हे सोलापूर दोन्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, अॅड. आंबेडकर यांनी परिस्थिती, जात आणि पैशाअभावी जो समाज सत्तेपासून वंचित राहिला आहे, अशा समाजघटकांना एकत्रित केले आहे. त्यांच्यातील आत्मबळ व आत्मसन्मान जागृत करण्यासाठी सत्ता संपादन अभियान
राबविले जात आहे .

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: