नवी मुंबईमुंबईयोजनारणधुमाळीराज्यसामाजिक संस्था

लालडोंगर सामुहिक अत्याचार प्रकरणी गुन्हेगारांना अटक करून कडक शासन करावे -वंचित बहुजन आघाडी

Spread the love

मुंबई –  लालडोंगर चेंबूर येथील मुलीवर सामुहिक अत्याचार  झाल्याची तक्रार दाखल होऊन १ महिण्यापेक्षाही अधिक काळ झाला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.पीडित मुलीचा औरंगाबादचेथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करावी  आणि गुन्हेगारांना अटक करून कडक शासन करावे या बाबत वंचित बहुजन महिला आघाडीच्या  अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी  मुंबईच्या पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.

 

एक महिण्यापेक्षाही अधिक काळ झाला तरी या प्रकरणी अजून या प्रकरणातील गुन्हेगाराला अटक झालेली नाही यावरून   महिला सुरक्षेच्या दृष्टीने सरकार आणि पोलिस प्रशासन गंभीर नाही हे दिसून येत आहे . वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध करीत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली .

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: