अहमदनगरउत्तर महाराष्ट्रप्रशासनमदतीचा हातयुथ कट्टारणधुमाळीराज्यसामाजिक

अहमदनगर जिल्ह्यात “वंचित” जोडो अभियानास लोकांचा वाढता प्रतिसाद.

Spread the love

अहमदनगर – वंचित बहुजन आघाडीतर्फे अ‍ॅड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखालील वंचित जोडो अभियानास अहमदनगर जिल्ह्यात तसेच कर्जत जामखेड तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.या अभियानामध्ये प्रत्येक गावात जाऊन अ‍ॅड. अरुण जाधव यांनी तेथील मतदारांशी संवाद साधत वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

कर्जत  जामखेड तालुक्यात गेल्या ७० वर्षांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप शिवसेनेची सत्ता होती तरीदेखील मतदार संघाचा विकास झाला नाही. रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य, शेतकरी सर्वसामान्य व गोरगरीबाच्या हिताच्या कुठल्याही ठोस योजना राबविल्या नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत-जामखेड तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. मात्र दुष्काळ निवारण्यासाठी देखील काही कामे घेतांना दिसत नाहीत. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधी जनतेला कुकडीचे पाणी आणण्याचे अमिष दाखवत आहेत. तर काही इच्छुक उमेदवार केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून धनशक्तीचे प्रदर्शन करीत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी कर्जत-जामखेड तालुक्यात एका दिवसासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. त्याऐवजी तो पैसा कर्जत-जामखेडच्या दुष्काळ निवारण्यासाठी वापरला असता तर बरे झाले असते असा टोला अ‍ॅड. अरुण जाधव यांनी केला.

सर्व गावांमधून वंचित बहुजन आघाडीची कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविण्यामागची भूमिका स्पष्ट करणारा प्रचार रथ फिरविण्यात आला. गावोगावी ग्रामस्थांनी वंचित जोडो अभियानाचे उस्फूर्तपणे स्वागत केले. या अभियानात भारिप चे जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, लोकाधिकार आंदोलनाचे बापू ओहळ, वडार समाजाचे प्रतिनिधी अंकुश पवार, विकास म्हस्के, भटके विमुक्तांचे प्रतिनिधी विशाल पवार, द्वारका पवार, अरुण डोळस संतोष चव्हाण, संदिप सोनवणे, श्रीकांत सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: