इतरदातापश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्य

सांगलीतील पूरग्रस्तांना खाकरा पॅकेटचे वाटप; सहयाद्री इंडस्ट्रीज लिमिटेड ‘चा पुढाकार

*" संकटाने खचून नका जाऊ, आपण मिळून उभे राहू ! " चा दिला संदेश*

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – पुण्यातील सहयाद्री इंडस्ट्रीज लि. या कंपनीने आणि ‘ स्वस्तिक परिवार ‘ तर्फे सांगली जिल्ह्याच्या ९ गावातील पूरग्रस्तांना खाकरा या टिकाऊ आणि पौष्टिक खाद्यपदार्थाच्या पॅकेटचे आज वाटप करण्यात आले.

“संकटाने खचून नका जाऊ, आपण मिळून उभे राहू ! ” असा संदेश या पाकिटांवर लिहिला आहे. पुण्यातील सहयाद्री इंडस्ट्रीज लि. या कंपनीने आणि ‘ स्वस्तिक परिवार ‘ ने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम आयोजित केला आहे. २९ ऑगस्ट रोजी तासगाव, ब्रहमनाळ, चोपडेवाडी, भिलवडी, अमनापूर, डिग्रज येथे पूरग्रस्तांना खाकरा पाकिटे दिली गेली.

३० ऑगस्ट रोजी कुरुंदवाड, दत्तवाडी, टाकळीवाड, टाकळी, राजापूर, खिद्रापूर, येथे या खाद्यपदार्थाची पाकिटे दिली जाणार आहेत. कंपनीचे विपणन विभागाचे सरव्यवस्थापक दत्तात्रय दौंडकर , सागर मसुरेकर, श्रध्दा घोषाल, उपेंद्र देव, सचिन शिंदे, स्वाती सातपुते हे कंपनीचे अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: