अहमदनगरउत्तर महाराष्ट्रकोकणकोल्हापूरगरजवंतदातापश्चिम महाराष्ट्रपुणेप्रशासनमदतीचा हातमराठवाडामुंबईयोजनारणधुमाळीराज्यविदर्भसांगलीसातारासामाजिकसामाजिक संस्था

ब्रम्हनाळ गावांतील जमीनदोस्त झालेली घरे बांधण्याच्या कामाला झाली सुरुवात …!

Spread the love

सांगली – महापुराचा तडाका बसलेल्या व प्रचंड प्रमाणात वित्तहानी व जीवितहानी  झालेल्या पुरग्रस्त ब्रम्हनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

याच पुनर्वसन कार्यातील  भाग म्हणून ज्या लोकांचे घरे जमीनदोस्त झालेली आहेत अशा लोकांना  वंचित बहुजन आघाडीकडून लोकांना घरे बांधून देण्यास सुरुवात झालेली आहे . आंबेडकर महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत ज्यांनी सरकारच्या पोकळ धोरणांवर व यंत्रणेवर अवलंबून न राहता सामाजिक जबाबदारी म्हणून गाव दत्तक घेऊन गावाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतली आहे .

प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसापूर्वी गावात भेट देऊनपुनर्वसन कार्याचा आढावा घेऊन तात्काळ घरे बांधून देण्याच्या सूचना कारकर्त्यांना दिल्या होत्या . आता जमीनदोस्त झालेली घरे बांधण्यास सुरवात झाल्यामुळे गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

गावात पुराचे पाणी घुसले असतांना स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: