इतरदातापश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्यशिक्षण

पुरग्रस्तांसाठी युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल चा ‘ एक हात मदतीचा ’

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून ईगल एज्युकेशन सोसायटीचे युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज( कात्रज-कोंढवा रस्ता ) यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. या मदतीचे स्वरूप धान्य, कपडे, टिकाऊ कोरडे अन्नपदार्थ,चादर, शाल, रग, स्वेटर असे होते.

रविवारी दि. 25 ऑगस्ट रोजी ही मदत शाळेच्या वाहनांनी सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर ए. मुलाणी , प्राचार्य सौ.जयश्री जाधव , उपप्राचार्य सौ. सुनिता चांदगुडे व संस्थेच्या पदाधिकारी डॉ. तस्नीम मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक,कर्मचारी, पालकवर्ग व विद्यार्थी यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: