दातापश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्य

दिघी येथे नवजीवन शिक्षण संस्थेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप

Spread the love

धनंजय पोटदुखे, (दिघी-पिंपरी चिंचवड) –  दिघी येथील नवजीवन शिक्षण संस्थेचे” रामचंद्र गायकवाड प्राथमिक, पूर्वप्राथमिक, माध्यमिक विद्यालय व जुनियर कॉलेज, आयोजित कार्यक्रम “शालेय विद्यार्थी मोफत सायकल वाटप समारोह साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय कृष्ण कुमार गोयल (डायरेक्टर कोहिनूर ग्रुप) अध्यक्ष दिलीप देशमुख (सहआयुक्त धर्मादाय पुणे) महेश दादा लांडगे (आमदार भोसरी विधानसभा ) किरण खुळे (सामाजिक कार्यकर्ते) राहुल दादा जाधव (महापौर पिंपरी चिंचवड मनपा) निर्मलाताई गायकवाड (नगरसेविका पिंपरी चिंचवड मनपा) डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी प्रौढ व निरंतर शिक्षण संचनालय) खराटे साहेब (सहाय्यक शिक्षण निरीक्षक) तसेच दत्तात्रय गायकवाड शिक्षण संस्था संस्थापक उदय गायकवाड नवजीवन स्पोर्ट्स फाऊंडेशन दिघी इ. मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिलीप देशमुख (आयुक्त धर्मादाय पुणे) यांची निवड करण्यात आली. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर सायकल पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांना श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. दत्तात्रय गायकवाड यांनी विद्यालयाचे प्रास्ताविक सांगितले.

सर्वांच्या भाषणानंतर विद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे पालक यांना घेऊन उपस्थित मान्यवर यांच्यासमवेत सायकल वाटप करण्यात आले. सायकल चालवण्याचे फायदे सायकल चालवण्याची गरज उपस्थित मान्यवरांनी सांगितली. विद्यालयातील 50 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.

दिलीप देशमुख महाराष्ट्र शासन यांच्या सरकारी योजने अंतर्गत व नवजीवन स्पोर्ट्स फाऊंडेशन दिघी यांच्या सतत पाठपुराव्यामुळे व सहकार्याने विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी पाटील यांनी केले.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व संचालक, व्यवस्थापिका ,मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व जण उपस्थित होते. अध्यक्षांच्या परवानगीने उदय गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: