अकोलाअमरावतीअहमदनगरइतरउत्तर महाराष्ट्रउस्मानाबादऔरंगाबादकोकणकोल्हापूरगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरजळगावजालनाठाणेधुळेनंदुरबारनवी मुंबईनांदेडनागपूरनाशिकपरभणीपश्चिम महाराष्ट्रपालघरपुणेप्रशासनबीडबुलढाणाभंडारामदतीचा हातमराठवाडामुंबईमुंबईयवतमाळयुथ कट्टायोजनारणधुमाळीरत्नागिरीराज्यरायगडलातूरवर्धावाशिमविदर्भसांगलीसातारासामाजिकसामाजिक संस्थासिंधुदुर्गसोलापूरहिंगोली

वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास ओबीसींचे स्वतंत्र बजेट करू – प्रकाश आंबेडकर

Spread the love

मुंबई –  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मुबंईत पत्रकार परिषद घेत त्यात त्यांनी महत्वाची घोषणा केली   “वंचित बहुजन आघाडीची  सत्तेत आल्यास  अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या स्वतंत्र बजेट प्रमाणेच  ओबीसींचे ही स्वतंत्र बजेट करून ओबीसी  विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, फ्रीशिप ही दिली जाईल. तसेच बजेटमध्ये तरतूद करताना स्कॉलरशिपसाठी वाढीव महागाई निर्देशांकानुसार ती ठरवण्यात येईल.

तसेच पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जाईल व क्रिमिलियर काढण्यासाठी शासन स्तरावर एक अभ्यास गट नेमला जाईल .या अभ्यासानंतर जो निर्णय येईल त्या पद्धतीने तात्काळ अंमलबजावणी वंचित बहुजन आघाडी करेल असेही सांगण्यात आले .

ओबीसी विद्यार्थ्यांना फ्रीशिप देखील मिळत नाही त्यामुळेच राज्यात उच्च शिक्षणात बऱ्याच जागा रिक्त असतात त्यातही ऐपत नसल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण हक्का पासून  त्यांना  वंचित राहावे लागते. ओबीसीं विद्यार्थ्यांना देखील एससी एसटी प्रमाणे सर्व स्तरावर सर्व टप्प्यावर स्कॉलरशिप लागू करून पुरेसा निधी बजेट अंतर्गत दिला जाईल .

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: