अर्थव्यवस्था

५,५०० एटीएम वर्षभरात बंद नोटबंदीचा बसला फटका

Spread the love

मुबंई – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या वर्षभरात देशभरातील साडेपाच हजार एटीएम बंद केली आहेत. या बँकांनी आपल्या सहाशे शाखांनाही टाळे लावले आहे. खर्चकपात करण्यासाठी बँकांनी हे पाऊल उचलले .

स्टेट बँक ऑफ इंडिया, विजया बँक, देना बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक आणि अलाहाबाद बँकेचा समावेश आहे. स्टेट बँकेने सर्वाधिक म्हणजे ७६८ एटीएम तसेच, ४२० शाखा बंद केल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने (विजया व देना बँकेच्या विलीनीकरणानंतर) २७४ एटीएम व ४० शाखा बंद केल्या आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पल्लव महापात्रा यांनी सांगितले की, ग्रामीण व निमशहरी भागांतील एटीएमच्या संख्येत मात्र घट करण्यात आलेली नाही. शहरी भागांत अनेक बँका कार्यरत असून या बँकांमध्ये मोठी स्पर्धा आहे. एकाच भागात विविध बँकांची एटीएम असतील तर त्यांचा सरासरी वापरही कमी होतो.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: