सामाजिक

भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात ,नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांची कबुली, भाजप सरकार अडचणीत

Spread the love

मुंबई – भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आल्याची कबुली नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दिली आहे. गेल्या 70 वर्षात सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती सर्वात वाईट झाली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाल्याचं आता नीती आयोगाने मान्य केल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला चागंलाच धक्का बसला आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या नव्या सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्याविषयी गौरवोदगार काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या पाच वर्षांत भारताची अर्थव्यवस्था फाइव्ह ट्रिलियन डॉलरची करण्याचा मनसुबा जाहीर केला. पुढचा महिनाभर मोदी सरकार २.०च्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पाचं गुणगान होत राहिलं.

मात्र ऑगस्टच्या अगदी सुरुवातीला बातमी आली की, जागतिक क्रमवारीत भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर ढकलली गेली आहे. आणि तेव्हापासून भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदीची चर्चा चालू झाली यातच आता नीती आयोगाच्या उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आल्याची कबुली दिल्याने नरेंद्र मोदी सरकार डचणीत आल्याचे दिसत आहे .

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: