अकोलाअमरावतीअहमदनगरउत्तर महाराष्ट्रउस्मानाबादऔरंगाबादकोकणकोल्हापूरगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरजळगावजालनाठाणेधुळेनंदुरबारनवी मुंबईनांदेडनागपूरनाशिकपरभणीपश्चिम महाराष्ट्रपालघरपुणेप्रशासनबीडबुलढाणाभंडारामनोरंजनमराठवाडामुंबईमुंबईयवतमाळयुथ कट्टारणधुमाळीरत्नागिरीराज्यरायगडलातूरवर्धावाशिमविदर्भसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरहिंगोली

आघाडीत बिघाडी ? काँग्रेस “वंचित” सोबत जाणार

Spread the love

मुबंई (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते, कार्यकर्ते पक्षाला सोडून जात आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेस पक्षसुदधा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज झाला आहे. लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीने काम केले नाही अशी कार्यकर्त्यांची चर्चा आहे. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना महाराष्ट्रात पराभव पत्करावा लागला असल्याने कॉंग्रेसचे नेतेही राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कॉंग्रेस पक्ष राष्ट्रवादी बरोबर असलेली आघाडी तोडण्याच्या तयारीत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातून जोरदार पक्षांतर सुरू आहे. तर सत्ताधारी भाजपमध्ये जाण्यासाठी नेत्यांमध्ये जणूकाही स्पर्धा सुरू झाली आहे. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. राष्ट्रवादीतून आतापर्यंत ३० हून अधिक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेत दाखल झाले आहे. राष्ट्रवादीला दररोज एकापोठापाठ धक्के बसत आहेत. त्यात आता राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीला लागलेली गळती पाहता, काँग्रेसने सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी निश्चित मानली जात असली त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही. त्यातच नव्याने उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीची झोप उडविली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून वंचितला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यावर वंचितने काँग्रेसला अर्ध्या जागांची ऑफर देत राष्ट्रवादीला दूर ठेवण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे या आघाडीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्यात भाजप आणि शिवसेनेची मजबूत स्थिती पाहता, राष्ट्रवादीसोबत युती करण्यापेक्षा वंचितला सोबत घेतल्यास पक्षाला फायदा होईल, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये तयार होत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकाच जागी विजय मिळाला. तर राष्ट्रवादीने चार ठिकाणी विजय मिळवला. आकडेवारीवरून आघाडीचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीलाच झाला. तर अनेक मतदार संघात राष्ट्रवादीकडून हवी तशी मदत मिळाली नाही. त्यातच राष्ट्रवादीकडे ग्राउंड लेव्हलवर कार्यकर्त्यांची असलेली कमतरता समोर आली आहे. अशा स्थितीत वंचितसोबत गेल्यास भाजपला टक्कर देणे शक्य होईल, असा मतप्रवाह महाराष्ट्रातील काँग्रेसमधील नेतृत्वाचा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: