अकोलाअमरावतीअहमदनगरउत्तर महाराष्ट्रउस्मानाबादऔरंगाबादकोकणकोल्हापूरगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरजळगावजालनाठाणेधुळेनंदुरबारनवी मुंबईनांदेडनागपूरनाशिकपरभणीपश्चिम महाराष्ट्रपालघरपुणेबीडबुलढाणाभंडारामराठवाडामुंबईमुंबईयवतमाळयुथ कट्टारणधुमाळीरत्नागिरीराज्यरायगडलातूरवर्धावाशिमविदर्भसांगलीसातारासामाजिकसामाजिक संस्थासिंधुदुर्गसोलापूरहिंगोली

महाराष्ट्र काँग्रेसवर सोनिया गांधी नाराज

Spread the love

मुंबई – काँग्रेसने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना पूर्ण महाराष्ट्रात खूपच थंड प्रतिसाद मिळाला, अनेक मतदारसंघांसाठी एकही इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी पोहचले नाहीत. एकीकडे महाराष्ट्र काँग्रेस मधील अनेक नेते भाजप सेनेत जात आहेत तर दुसरीकडे काँग्रेसला उमेदवारही मिळेनासे झाले आहेत. यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी महाराष्ट्र काँग्रेस मधील नेत्यांवर नाराज असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहीती मिळाली आहे.

दिल्लीमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत सोनिया गांधींनी पुढील प्रश्न केला . काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाकडे अनेक मतदारसंघांमध्ये एकही इच्छुक उमेदवार नाही. याचे कारण काय? महाराष्ट्रातील नेते काय करीत आहेत?’ महाराष्ट्रात काँग्रेसच्या या दुर्दशेसाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर सोनिया गांधी नाराज असून लवकरच त्यांना दिल्ली येथे बोलवून महाराष्ट्र काँग्रेसच्या या परिस्थितीचा जाब विचारण्यात येणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: