अकोलाअमरावतीअहमदनगरउत्तर महाराष्ट्रउस्मानाबादऔरंगाबादकोकणकोल्हापूरगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरजळगावजालनाठाणेधुळेनंदुरबारनवी मुंबईनांदेडनागपूरनाशिकपरभणीपश्चिम महाराष्ट्रपालघरपुणेप्रशासनबीडबुलढाणाभंडारामराठवाडामुंबईमुंबईयवतमाळयुथ कट्टारणधुमाळीरत्नागिरीराज्यरायगडलातूरवर्धावाशिमविदर्भसांगलीसातारासामाजिकसिंधुदुर्गसोलापूरहिंगोली

मी वंचित बहुजन आघाडी सोबतच – गोपीचंद पडळकर

Spread the love

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर शेतकरी कामगार पक्षात जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. यावर खुद्द  पडळकर यांनीच पडदा टाकला आहे. आपण अजूनही वंचित आघाडीसोबतच असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार आहे. मात्र, केवळ सामाजिक पातळीवर आंदोलने
करून प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी  राजकीय पातळीवर देखील लढाई लढावी लागते. त्यामुळेच सत्तेत गेले पाहिजे, हे आता धनगर समाजाला समजले आहे. सांगोला मतदारसंघ  गणपतराव देशमुख यांचा आहे. ते रिंगणात नसले, तर मी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याचेही पडळकर म्हणाले. सांगोला मतदारसंघात धनगर आणि बहुजन समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: