क्रीडापश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

प्राध्यापक डॉ. अभय लुने यांनी आयर्नमॅन स्पर्धेत मिळविले यश; केले भारताचे प्रतिनिधित्व

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पिंपरी) – येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्ररोग शल्य चिकित्सक डॉ. अभय लुने यांनी नुकत्याच ज्यूरिच, स्वीत्झर्लंड येथे आयर्नमॅन २०१९ स्पर्धा यशस्वी रित्या पूर्ण करून मिळविले यश केले भारताचे प्रतिनिधित्व. सर्वच क्षेत्रातील स्पर्धक यात सहभागी होते. या स्पर्धेत ३.८ किमी जलतरण, त्यानंतर १८० किमी सायकलिंग, शेवटी ४२ किमी धावणे या तीन प्रकारांचा यात समावेश होता. ही स्पर्धा १६ तासांच्या आता पूर्ण करणे अपेक्षित होते. डॉ. लुने यांनी १४ तास ३२ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली.

जगभरातील एकूण २०००हुन अधिक स्पर्धक यात सहभागी झाले होते. भारतातून २० स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यातील ८ स्पर्धक ही स्पर्धा पूर्ण करू शकले, त्यात डॉ. लुने यांनी भारताच्या क्रमवारीत ३ क्रमांक मिळविला व ४५ ते ४९ वयोगटात २११वे स्थान प्राप्त केले.

“डॉ अभय लुने यांनी ज्यूरिच, स्वीत्झर्लंड येथे आयर्नमॅन २०१९ स्पर्धेत मिळविलेले यश फारच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील खेळाडू विद्यार्थाना ते प्रेरणास्रोत आहेत तसेच डॉ अभय लुने हे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील एकमेव प्राध्यपक आहेत की ज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला व यश प्राप्त केले” या शब्दात वैदकीय महाविद्यायाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यापीठाचे कुलपती डॉ पी. डी. पाटील व उपाध्यक्षा भाग्यश्रीताई पाटील, कोषाध्यक्ष व ट्रस्टी यशराज पाटील यांनी डॉ. अभय लुने यांचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. अभय लुने यांनी आता पर्यंत मुंबई मॅरेथॉन, लडाख मॅरेथॉन, सातारा हिल मॅरेथॉन, कोल्हापूर हाफ आयर्नमन अश्या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. गिर्यारोहणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून एव्हरेस्ट सर करण्याचा त्याचा मानस आहे. आयर्नमॅन २०१९ स्पर्धेतील यशाचे सारे श्रेय त्यांनी कुटूंबीय, मित्र व डॉ. डी. वाय. पाटील मधील सहकारी याना दिले आहे. प्रशिक्षक सुनील मेनन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: