इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यशिक्षण

कर्मयोगाद्वारे विश्‍वशांतीचा संदेश जगासमोर मांडला – डॉ. विश्‍वनाथ कराड

योगेश माथूरिया यांना ‘रोटरी शांतीदूत पुरस्कार

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – “कर्मयोगा द्वारे सर्व काही साध्य होते. या सूत्राचे पालन करून विश्‍वशांतीचा व मानवतेचा संदेश देणारे योगेश माथूरिया खर्‍या अर्थाने भारतीय संस्कृती जगासमोर मांडली आहे. या देशाने सदैव त्याग आणि समर्पणाचा मार्ग दाखविण्याचे कार्य केले आहे.”असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचेे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांनी मांडले.

रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरच्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने ‘संघर्ष विरहित शांतता एक चळवळ’ या कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी योगेश माथूरिया यांना प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा कराड व रोटरी पुणे जिल्हा ३१३१ चे प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते ‘शांतीदूत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी रोटरी ३१३१चे डिस्ट्रीक्ट चेअरमन प्रदिप डांगे, रोटरी ३१३१ चे डिस्ट्रीक्ट डायरेक्टर डॉ. प्रदिप वाघ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एस. परशुरामन, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, अंजली रावेतकर आणि अश्‍विनी अंबिके हे उपस्थित होते.

डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“जगात संपूर्ण भारताची ओळख ही भगवान गौतम बुध्द आणि महात्मा गांधी यांच्या नावाने आहे. या सृष्टीवर विज्ञान आणि अध्यात्माच्या आधारेच शांती येईल. भारताचा खरा संदेश मानवता आणि वैश्‍विक शांती संपूर्ण जगात पोहचविण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या घुमटाची महत्वाची भूमिका आहे. याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे सर्वात सुंदर दर्शन जगासमोर मांडण्याचा हा मानस आहे. २१ व्या शतकात भारत माता विश्‍वगुरू म्हणून उदयास येईल. संपूर्ण मानव जातीला शांतीचा मार्ग दाखविले.”

योगेश माथूरिया म्हणाले,“ वसुधैव कुटुम्बकम या नुसार संपूर्ण जगात मानवता व शांतीचा संदेश पोहचविण्यासाठी २ ऑक्टोबर पासून दिल्ली ते जिनिव्हा अशी पदयात्रा करणार आहे. त्यानंतर जिनिव्हा ते लंडन पदयात्रा करून जास्तीत नागरिकांपर्यंत मानवतेचा संदेश पोहचविण्याचे कार्य करू. हाच संदेश पुढील युवा पिढीच्या हातात देणार आहे. साऊथ अफ्रिकेत ६० दिवस केलेल्या पदयात्रेच्या वेळेस आलेल्या अडचणी ही त्यांनी सांगितल्या.”

रवी धोत्रे म्हणाले,“ समाजाला समज देण्याचे कार्य रोटरीच्या माध्यमातून केले जाते. विश्‍व शांतीचा संदेश संपूर्ण जगात पोहचविणारे योगेश माथूरिया हे गेल्या ९ वर्षापासून चालत आहेत. वर्तमान काळात आपण समाजाचे कृतज्ञ असतो यांचा विसर सर्वांना पडला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी ठरेल.”

डॉ. प्रदिप वाघ म्हणाले,“संपूर्ण जगात शिक्षण, पाणी, आरोग्य आणि शांतीसाठी सर्वात मोठ्या प्रमाणात रोटरीच्या माध्यमातून कार्य करून आम्ही समाजाला महत्वपूर्ण योगदान देत आहोत. वसुधैव कुटुम्बकम या धारणेवर आम्ही एकतेचे कार्य करीत आहोत.”

प्रदिप डांगे यांनी प्रस्ताविक केले. अंजली रावेतकर यांनी स्वागत पर भाषण केले. भारती डोळे यांनी सूत्रसंचालन केले. शरद डोळे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: