इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेयुथ कट्टाराज्यशिक्षण

केंद्र व राज्याने अंदाजपत्रात शिक्षणासाठी भरीव तरतूद करावी – मनिष सिसोदिया

मिटसॉगच्या १५ तुकडीचा शुभारंभ

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – “देशातील सर्वच राज्यातील सरकारी शाळेतील पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारच्या असतील असे नाही. आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये विरोधाभास असल्याचे जानवते. विद्यार्थ्यांना सरकारी शाळामधून उत्तम प्रकारचे शिक्षण द्यावयाचे असेल, तर केंद्र व राज्य सरकारने अंदाजपत्रात शिक्षणावरील खर्चात भरीव तरतूद करावी.”असे विचार दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मांडले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या १५ व्या तुकडीच्या शुभारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. लोकसभेचे खासदार अ‍ॅड. पिनाकी मिश्रा व शिवसेनाच्या उपनेता प्रियंका चतुर्वेदी या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एस. परशूरामन, प्र कुलगुरू डी.पी.आपटे, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सह संचालिका प्रा.डॉ. शैलश्री हरिदास, डॉ. अनुराधा पाराशर आणि प्रा. मिलिंद पात्रे उपस्थित होते.

मनिष सिसोदिया म्हणाले,“ या देशाला शिक्षणाच्या आधारे उभे करावयाचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून दहशतवाद आणि हिंसा संपविता येते. त्यामुळे दिल्लीतील सर्व सरकारी शाळांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधार आणून तेथे ४४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तसेच हॅपिनेस कार्यक्रमाच्या माध्यमातून रोज १६ लाख विद्यार्थी मेडिशन करतात.”

“शिक्षणाच्या माध्यमातून जगात विश्‍व शांती येऊ शकते यासाठी एमआयटी संस्था कार्यरत आहे. तसेच राजकारणाचे प्रशिक्षण देणार्‍या या संस्थेने आता नेते बनणार्‍यांसाठी नवा पाठ्यक्रम सुरू करावा. त्याच्या माध्यमातून या देशातील राजकारणातील वैचारिक पोकळी भरून निघेल. राजकारणात प्रवेश करणारे विद्यार्थी जेव्हा देशसेवेचे स्वप्न पाहतील तेव्हाच त्यांचे व कुटुंबाचे स्वप्न पूर्ण होईल. लोकशाहीमध्ये आंदोलनाची ताकद मोठी आहे. ज्याच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळू शकते. त्यामुळे राजकारणत प्रवेश करणार्‍या युवाकांनी समाजाच्या प्रश्‍नांसाठी आंदोलनाचे शस्त्र उचलावे.”

पिनाकी मिश्रा म्हणाले,“ १७ व्या लोकसभेत महिला बील पास होईल असी आशा वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात परिवर्तनाची लहर आणली आहे. त्यांनी लोकसभेत जीव ओतला आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडिसात सर्वप्रथम १२ टक्के महिला आरक्षण आणले होते. त्यानंतर राज्यात ५० टक्के आरक्षण केले आहे. पुढील काळात लोकसभेमध्ये अनेक महिला खासदार दिसतील.”

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या,“धर्माच्या आधारे चांगल्या मार्गावर चालावे असे सांगणारे संत ज्ञानेश्‍वर यांचा हे सूत्र राजकारणासाठी लागू होतो. राजकारणातून समाजसेवा करणार्‍यासाठी मिटसॉग हा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. तसेच सेवा हाच धर्म लक्षात ठेऊन चांगल्या विचारधारेवर चालून देश सेवा करावी. देशात संतुलन ठेवण्यासाठी सत्ताधारी बरोबरच विरोधी पार्टीची गरज आहे. राजकारणात महिलांची संख्या वाढत आहे परंतू पार्टीत त्यांना महत्वाचे पद दिल्यास देशात परिवर्तन येईल.”

प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ टी.एन. शेषण यांचा आभारी आहे. त्यांच्या माध्यमातून स्कूल ऑफ गव्हर्नमेंट सुरू झाली. राजकारण व समाजिक कार्य करताना चारित्र्य आणि शिस्त या दोन गोष्टी असणे गरजेचे आहे. येथे राजकारणाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी आपल्या भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. जेणे करून सर्वासामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यास मदत मिळेल.”

प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले,“ राजकारणातील बदलाला पाहुण आम्ही स्कूल ऑफ गव्हर्नमेंटीची स्थापना केली. राजकारणात शिक्षीत युवकांनी सहभाग घ्यावा हा याचा मुख्य उद्देश आहे. देशात विकास आणि परिवर्तन आणायचे असेल तर राजकारणाचे शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. बीसीएस सारखे अनेक उपक्रम संस्थेद्वारे केले जात आहेत.”

यावेळी संबल झा आणि अरविंद शर्मा या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. प्रा. डॉ. शैलश्री हरिदास यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. परशूरामन यांनी स्वागत पर भाषण केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: