इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेयुथ कट्टाराज्यशिक्षण

केजेज् ट्रिनिटी महाविद्यालयाच्या टीमची ‘सुप्रा इंडिया’मध्ये उल्लेखनीय कामगिरी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘एसएई इंडिया सुप्रा २०१९’मध्ये येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

मेकॅनिकल शाखेच्या २५ विद्यार्थ्यांनी ‘ट्रेब्लेझर मोटारस्पोर्ट’ टीम उभी केली होती. या टीमने अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत ‘सुप्रा व्हेईकल’ तयार करून दाखविली आहे. या स्पर्धेत ट्रीनिटीच्या विद्यार्थ्यांना एन्ड्युरन्स टेस्टमध्ये पहिल्या २० मध्ये येण्याचा बहुमान मिळाला.

सस्पेंशन, स्टीयरिंग, ब्रेकिंग, ट्रांसमिशन यासह या सुप्रा व्हेईकलची प्रत्येक सिस्टिम या टीमने अतिशय कल्पकतेने उभी केली आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव यांनी कौतुक केले आहे.

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ट्रिनिटीच्या विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, कल्पकता यातून ही गाडी बनवली असून, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे कल्याण जाधव म्हणाले.

विद्यार्थ्यांना इनोव्हेशन आणि संशोधनासाठी अशा उपक्रमांची मदत होत असल्याचेही ते म्हणाले. प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, प्रा. प्रतीक आवर्त व विजय मेमाने यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केजे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य यामध्ये मोलाचे ठरले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: