आरोग्यइतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यशिक्षण

डॉ.डी.वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने पूरग्रस्त भागात आरोग्य पथक रवाना

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पिंपरी) – पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्यावतीने कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त भागात वैद्यकीय आरोग्य पथक रवाना करण्यात आले आहे.

कोल्हापूर व सांगली या दोन भागासाठी दोन वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व सेवासुविधांनी युक्त रुग्णवाहिका,डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, दहा लाखांहून अधिक किमतीची आवश्यक औषधे तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय साहित्य, व उपकरणांचा यात समावेश आहे.

यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा मा. भाग्यश्रीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच चव्हाण उपस्थित होते.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. डी. पाटील, ट्रस्टी डॉ स्मिता जाधव, कोशाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही वैद्यकीय आरोग्य पथके कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त भागात पाठविण्यात अली आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: