परभणीमराठवाडाराज्य

परिवहन मंत्री रावते यांच्या हस्ते होणार नवीन बसस्थानकाचे भूमिपूजन

Spread the love

महाराष्ट्र विश्‍व न्यूज, (परभणी) ः- परभणी येथील बसस्थानकाची इमारत जूनी झाली असल्याने एअर पोर्टच्या धर्तीवर नवीन बस पोर्ट (बसस्थानक) परभणीसाठी मंजूर करावे, अशी मागणी परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते  यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने उद्या बुधवार, १४ ऑगस्ट रोजी  १० वाजता परभणी येथील नूतन बसस्थानक इमारतीचा भूमिपूजन सोहळा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याहस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि.प. अध्यक्षा उज्वला राठोड, खासदार संजय जाधव, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अब्दुल्ला खान दुर्राणी, रामराव वडकुते, विप्लव बजोरिया, डॉ. राहुल पाटील, विजय भांबळे, डॉ. मधुसूदन वेंâद्रे, मोहन फड, महापौर मीनाताई वरपुडकर, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापीक संचालक रणजितसिंह देओल, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, मनपा आयुक्त रमेश पवार यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील आणि विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांंनी केले आहे.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नवीन बसस्थानक उभारणीसाठी  १३ कोटी ४ लाख ४८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नवीन बसस्थानकाच्या प्रारुप आराखड्यात अद्यायावत १६ गाळे, २ अनलोडिंग प्लॉफॉर्म, इमारतीच्या दोन्ही बाजूस प्रसाधनगृह, भव्य उपहारगृह, ९ व्यापारी गाळे, स्वतंत्र पोलीस कक्ष, हिरकणी कक्ष,पार्सल कक्ष, स्वस्त औषधालय (जनेरिक मेडिकल), नियंत्रण कक्ष, एटीएम, आरक्षण कक्ष, प्रतिक्षालय, महिला चालक-वाहक विश्रांतीगृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रवासी वाहन पार्कींगची व्यवस्था आणि सुरक्षा कक्ष  अशा स्वरुपात बांधण्यात येणार आहे. नूतन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पुरुष चालक-वाहन विश्रांतीगृह, बहुउ्देशीय सभागृह, ८ विश्रांतीगृह, व्यायामशाळा, पुरुष शयनगृह आदी अत्याधुनियक सोयी-सुविधा उभारण्यात येणार असून इमारत बांधणीसाठी दोन वर्षाची मुदत वंâत्राटदाराला देण्यात आल्याची माहिती शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: