राजू शेट्टी वंचित बहुजन आघाडी सोबत ?

खरेदी करताय? तत्पूर्वी खालील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!
खरेदी करताय? तत्पूर्वी वरील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!
मुबंई (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या मत विभाजनामुळे राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेला वंचितने घेतलेली मते आघाडीची चिंता वाढविणारेच आहेत. त्यामुळे वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न आघाडीकडून करण्यात आले. परंतु, त्याला अद्याप यश आले नाही. लोकसभेला राजू शेट्टी आघाडीसोबत होते. आता विधानसभेला देखील शेट्टी यांनी आघाडीसोबत जाण्याची तयारी सुरू केली असली तरी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलेली आहे. शेट्टी यांनी वंचित ला सोबत घेतले तरच राष्ट्रवादी व काँग्रेस सोबतच्या आघाडी सोबत येईन असे सांगितले आहे.
शेट्टी यांनी आघाडीकडे ३५ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. विधानसभा निवडणूक आपण लढविणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी आधीच स्पष्ट केले असून विधानसभा निवडणुकीत संघटनेतील अधिकाधीक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा शेट्टी यांचा प्रयत्न आहे. यामुळे स्वाभिमानीचे पक्ष संघटन तळागाळापर्यंत मजबूत करण्यास फायदाच होईल. मात्र आघाडीतून त्यांना ३५ जागा मिळतील यावर शंका आहे. परंतु राजू शेट्टी वंचितसमोबत गेल्यास त्यांचा ३५ जागाचा लढविण्याचा इरादा पूर्ण होऊ शकतो. याचा फायदा पक्षसंघटन वाढविण्यासाठी होणार आहे. त्यामुळे शेट्टी यांच्यासाठी तरी आघाडीपेक्षा वंचितचा पर्यायच जवळचा आहे.