उत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईराज्य

कलम ३७० हटविण्याच्या निर्णय घेतल्यानंतर काश्मिर मध्ये रिलायन्स आर्थिक गुंतवणूक करणार

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी) – जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता काश्मीरची दारे सर्वांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे रिलायन्स समुहाने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत आज (सोमवार) 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या बैठकीत मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली. रिलायन्स जिओने गेल्या वर्षात मोठी भरारी घेतली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत रिलायन्सचे मोठे योगदान आहे. लोकाभिमुख उद्योग समूह करण्यात यश आल्याचे रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सांगितले.

अंबानी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर व लडाखबद्दल एक स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे आमच्या कंपनीने काश्मीर आणि लडाखमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी आम्ही एक टीम बनविली असून, लवकरच ती तेथे जाऊन सर्वेक्षण करेल. येथील गुंतवणूक आम्ही लवकरात लवकर घोषणा करणार आहोत.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: