कोल्हापूरगरजवंतदातापश्चिम महाराष्ट्रपुणेप्रशासनमदतीचा हातयोजनारणधुमाळीराज्यसांगलीसातारासामाजिकसामाजिक संस्था

मुख्यमंत्र्यांनी पुरपरीस्थीती गांभीर्याने घेतलेली नाही – प्रकाश आंबेडकर

Spread the love

मुबंई (प्रतिनिधी ) – ११ ऑगस्ट रोजी प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पुरपरीस्थीतीची पाहणी केली होती या संदर्भात आंबेडकर यांनी मुबंई येथे पत्रकार परिषद घेत भाजप सरकारला धारेवर धरत मदत व पुनर्वसन कार्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले पुरात अडकलेल्या लोकांना अन्न, वस्त्र यांसारख्या मुलभुत व जीवनावश्यक वस्तूंची देखील मदत सरकार कडून पुरवली जात नाही जी मदत आतापर्यंत लोकांनी पोहचलेली आहे ती सामाजिक संस्थाच्या मार्फत पोहोचली आहे.

लोकांना पुरा मधून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ कोणतेही पाऊल उचलले नाही त्यामुळे अनेक लोक पाण्यात अडकून राहीली.

धरणातून पाणी सोडताना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नाही ईशारा देण्यात आला असता तर नदी काठच्या गावांमध्ये जीवीत हानी टाळता येऊ शकत होती पण तसे
शासना कडून झाले नाही.

आपत्ती व्यवस्थापनापासून सरकार पळ काढतय सरकारच्या निष्काळजीपणा मुळेच पूरपरीस्थीती गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे .सरकारच्या अंसवेदनशील व उदासीन धोरणाचा आम्ही निषेध करतो असे प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: