जळगावपश्चिम महाराष्ट्रपुणेप्रशासनरणधुमाळीराज्य

सोलापूरात “वंचित”च्या कार्यकर्त्यांनी EVM वाहतूक करणारा कंटेनर आडवला

Spread the love

सोलापूर (प्रतिनिधी) –

महाराष्ट्रात पुढील दोन महीन्यात विधानसभा होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर बंगळूर कडून पुण्याकडे जाणारा २८०० EVM मशीन्स घेऊन जाणारा कंटेनर सोलापूरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आडवले आहेत.

सध्या EVM हटाव व देश बचाव व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरत असताना EVM मशीन्स घेऊन जाणारे ट्रक आडवल्याने EVM घोटाळ्या बाबत अधिकच शंका उपस्थित होत आहे.
बेंगलोर येथील भेल कंपनी कडून हे EVM पुणे व जळगाव येथे चाले होते असे कळतंय

वंचित बहुजन आघाडी चे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी
EVM मशीन्स ट्रक अडवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपावर टीका करत म्हणाले एकीकडे महाराष्ट्र कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पुरपरीस्थीती गंभीर आहे जनता त्रस्त आहे लोकांच मीडीयाच लक्ष तिकडं असतना भाजप ईकडे EVM सेट करण्यात व्यस्त झालंय असे चंदनशिवे यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकारणात लक्ष घालून संबंधित लोकांवर पोलिसांना कडे गुन्हा दाखल करण्यास स्थानिक कार्यकर्त्यांना सांगितले आहे .पुढील अधिक तपास पोलिस प्रशासन करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: